• Download App
    ममतांकडून भाजपला खिंडार पाडण्याचा प्रयत्न? मुकुल रॉयनंतर ममता दीदींची नजर आता दिलीप घोष यांच्यावर, चहापानाचे आमंत्रण दिल्याने विविध चर्चांना उधाण। Mamata's eye on Dilip Ghosh, inviting him to tea, increased political speculation

    ममतांकडून भाजपला खिंडार पाडण्याचा प्रयत्न? मुकुल रॉयनंतर ममता दीदींची नजर आता दिलीप घोष यांच्यावर, चहापानाचे आमंत्रण दिल्याने विविध चर्चांना उधाण

    या आमंत्रणानंतर ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.  Mamata’s eye on Dilip Ghosh, inviting him to tea, increased political speculation


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात चहापानासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना आमंत्रित केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या आमंत्रणानंतर ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

    यापूर्वी भाजपचे मोठे नेते मुकुल रॉय टीएमसीमध्ये परतले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह, रविवारी राजभवन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला भाजप नेते दिलीप घोष, तथागत रॉय आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी उपस्थित होते.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलीप घोष यांना राज्य सचिवालयात चहासाठी आमंत्रित केले, एवढेच नाही तर ममतांनी त्यांना काली पूजेला येण्याचे आमंत्रणही दिले. त्याचवेळी दिलीप घोष यांनी आमंत्रण स्वीकारल्यानंतर बंगाल भाजपमध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.



    2019 पासून ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये भाजपच्या यशामुळे मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच तृणमूलचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले होते, त्यानंतर ममता बॅनर्जी यांना असे वाटू लागले की, भाजप त्यांना बंगालमध्ये आव्हान देत आहे.

    विधानसभा निवडणुकीत विजयामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी तरीही त्यांना भाजपकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आता त्यांची नजर बंगाल भाजपच्या बड्या नेत्यांवर आहे.

    दिलीप घोष यांचे समर्थक मानतात की, त्यांनीच बंगालमध्ये भाजपला नवचैतन्य दिले. पण विरोधी पक्षनेतेपदी सुवेंदु अधिकारी यांची नियुक्ती झाल्याने समर्थक नाराज आहेत. दिलीप घोषही यामुळे पक्षावर नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी 2014 मध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात चहापानासाठी डाव्या आघाडीचे अध्यक्ष विमान बोस यांच्यासह काही डाव्या नेत्यांना आमंत्रित केले होते. डाव्या पक्षाच्या नेत्यांनी ममतांसोबत बसून चहा आणि फिश फ्रायचा आस्वाद घेतला होता.

    Mamata’s eye on Dilip Ghosh, inviting him to tea, increased political speculation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज