वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सीतलकुलची हिंसाचारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची मिरवणूक काढायची होती, असा खळबळजनक आरोप भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.Mamata wanted to remove the bodies after the Sitalkul violence; Sensational allegation of Amit Malviya
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी आठ टप्प्यात मतदान सुरु आहे. त्यापैकी 4 टप्पे पूर्ण झाले असून काही दिवसांपूर्वी सीतलकुलची परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपच्या अमित मालवीय यांनी जोरदार टीका केली आहे.
सीतलकुचीत 126 बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी हिंसाचार उफाळून आला होता. त्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बूथ ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात मरण पावलेल्यांचे मृतदेह घेऊन मिरवणूक काढायची होती. एसपी आणि आयसी यांना त्यांचे कामकाज ठरविण्याबाबत त्या बोलल्या होत्या.
तृणमूल काँग्रेसच्या सुशिक्षित उमेदवाराला तुरूंगात नजरकैदेत ठेवले. या कृतीविरोधात केंद्रांबद्दल चुकीची माहिती पसरवण्यास तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले होते, असे मालवीय यांनी सांगितले.