वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रात भाजपच्या मोदी सरकार ला पर्यायी नेतृत्व देण्यासाठी मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत काँग्रेसवरच जबरदस्त बॉम्बगोळा फेकला…!! कुठले युपीए…?? यूपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही…!!, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या नेत्या आणि यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच आव्हान दिले. शरद पवार यावेळी त्यांच्या शेजारी उपस्थित होते.Mamata Pawar meeting
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यातली आजची सगळ्यात महत्त्वाची भेट शरद पवारांची घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांना संबोधित केले. या वेळी शरद पवार यांनी देशातल्या समविचारी पक्षांनी केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. त्याच प्रमाणे त्यांनी सामूहिक नेतृत्वाचा मुद्दा प्रकर्षाने लावून धरला.
ममता बॅनर्जी – उद्धव ठाकरे भेट नाही; तब्येतीचे पथ्य आणि राजकीय पथ्यावर तब्येत!!
याच संदर्भात ममता बॅनर्जी यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्या म्हणाल्या, की मूळात संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात युपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही. त्यामुळे जे केंद्रातल्या भाजप सरकार विरोधात मजबुतीने उभे राहू शकतात त्या सगळ्या शक्तींना एकत्र करण्यासाठी आम्ही भेटलो आहोत. शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार जे सामूहिक नेतृत्वाविषयी म्हणाले ते १००% सत्य आहे. त्यामुळे आम्ही सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. आमचा उद्देश फक्त एकत्र येण्यापुरता नाही तर पर्यायी सामूहिक नेतृत्व उभे करण्याचा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. त्याला देखील ममता दुजोरा दिला.
ममता बॅनर्जी यांचा गेल्या सहा महिन्यांतील या राजकीय वाटचालीतला काँग्रेस वरचा हा सर्वात प्रखर हल्ला आहे. त्या आत्तापर्यंत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाला मानत नव्हत्या. परंतु युपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही, असे स्पष्ट बोलून त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वाला आव्हान दिले आहे.
एक प्रकारे आजच्या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसला राजकीय दृष्ट्या एकाकीच पाडले आहे. शरद पवार यांनी शिवसेना नेतृत्वविषयी देखील उल्लेख करत कालच आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे ममता बॅनर्जी यांना भेटले, असे आवर्जून सांगितले.
एकूण ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोन काँग्रेस मधूनच बाहेर आलेल्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला विरोधकांना मधून वगळून एकटे पाडण्याचे ठरवल्याचे दिसून येते.
Mamata Pawar meeting
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशन : काँग्रेसची मागणी – शेतकरी आंदोनातील मृतांना 5 कोटी द्यावे, सरकारचे उत्तर – आंदोलनातील मृत्यूंची नोंद नाही, भरपाईचा प्रश्नच नाही!
- मोठी बातमी : व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर करता येणार नाही ; जाणून घ्या कारण
- सचिन वाजे यांचा एनआयएवर टॉर्चर केल्याचा आरोप, म्हणाले – अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्या!