विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Mamata government एका पाकिस्तानी ट्रोलच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देणाऱ्या २२ वर्षांच्या कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा हिला कोलकाता पोलिसांनी अटक केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष बाब म्हणजे शर्मिष्ठाने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवून माफी मागितली होती, तरीही पोलिसांनी गुरुग्राम येथून तिला अटक करत कोलकात्याला आणले. हे सगळं ममता बॅनर्जी सरकारच्या आदेशाने घडलं, असा आरोप आता होत आहे.Mamata government
शर्मिष्ठाचा ‘गुन्हा’ इतकाच होता की, तिने पाकिस्तान समर्थक ट्रोलच्या हिंदू नरसंहार नाकारणाऱ्या वक्तव्यावर भावनिक प्रतिक्रिया दिली होती. पहलगाम येथील जिहादी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांनंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर शर्मिष्ठाने तीव्र भाषेत पाकिस्तानवर टीका केली होती. मात्र, पश्चिम बंगालमधील सरकार आणि पोलिस यंत्रणा यांनी तिच्यावर कठोर कारवाई केली.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, शर्मिष्ठा हिने माफी मागून व्हिडिओ हटवला असूनही तिच्यावर कारवाई करण्यात आली, तर दुसरीकडे तिच्या विरोधात ‘सर तन से जुदा’ अशा जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
पश्चिम बंगाल सरकारच्या अल्पसंख्याकधार्जिण्या धोरणांचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. यापूर्वी मुरशिदाबाद आणि संदेशखाली येथे हिंदूंवर झालेल्या अत्याचारांवर राज्य शासनाने दुर्लक्ष केलं, परंतु एक विद्यार्थिनी पाकिस्तानविरोधात बोलल्यामुळे तिच्यावर लगेच कारवाई झाली, हे ममता सरकारच्या दुटप्पीपणाचे उदाहरण ठरते.
तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि मानवी हक्क संघटनांनी शर्मिष्ठाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उघडपणे झालेल्या गळचेपीवर अजूनतरी कोणताही निषेध व्यक्त केलेला नाही. ज्या पद्धतीने देशातील काही निवडक गट एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या म्हणून लगेच गदारोळ उठवतात, त्या तुलनेत या प्रकरणातील शांतता अधिकच बोलकी आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक हिंदू कुटुंबांवर इस्लामी जमावांनी हल्ले केले आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, मुरशिदाबादमधील दंगल, धार्मिक धमक्या, जबर धर्मांतर यावर राज्य सरकारने कुठलीही ठोस कारवाई केली नाही. पण एक व्हिडिओ आणि काही कठोर शब्द वापरल्यावर पोलिसांना विद्यार्थीनीला अटक केली.
Mamata government’s dictatorship, Hindu student arrested for responding to Pakistani troll
महत्वाच्या बातम्या
- Baloch Army : ‘आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा
- Lalu Yadav : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी लालू यादव यांना मोठा धक्का!
- PF UPI : पीएफ, यूपीआय ते क्रेडिट कार्ड; १ जूनपासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार!
- Shubanshu Shukla : भारत अवकाशात इतिहास रचणार! शुभांशू शुक्ला मे महिन्यात अंतराळ स्थानकावर होणार रवाना