विधानसभा निवडणुकीत पंजाब मध्ये मतदारांनी प्रादेशिक घराणेशाही संपवली पण त्यापलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांचा पराभव दोन मतदारसंघाचा मध्ये करण्याचा विक्रम पंजाब पंजाबच्या मतदारांनी करून दाखवला त्याची पुनरावृत्ती उत्तराखंडात झाली. Mamata – Channi – Dhami bengal pattern
पण हा केवळ दिग्गजांना बसलेला पराभवाचा धक्का एवढ्यापुरते मानून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का देण्याचा पॅटर्न पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही दिसला आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस प्रचंड बहुमताने पश्चिम बंगाल मध्ये जिंकली, पण खुद्द ममता बॅनर्जी यांचा मात्र सुवेंदू अधिकारी यांनी निवडणुकीत पराभव केला होता. आज पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा यांचे पराभव झाले आहेत. उत्तराखंड मध्ये तर भाजपा सत्तेवर येऊन देखील मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे हा “बंगाल पॅटर्न” आहे.
बाकीच्या दिग्गजांना धक्का बसणे या फारसे नवीन नाही, पण पक्षाची लाट असूनही मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का बसतो याचा अर्थ आता मतदार पारंपारिक विश्लेषकांची भाषा “दिग्गज”, “बालेकिल्ला”, “50 वर्षांची संसदीय कारकीर्द”, अशा स्वरूपाच्या गोष्टींना भुलत नाही हेच यातून स्पष्ट होताना दिसते…!!
पंजाबमध्ये आजी-माजी दोन्ही मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी या निवडणुकीत दोन जागांवरुन निवडणूक लढवली. या दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चमकौर साहिब मतदारसंघातून आपचे उमेदवार चरणजीत सिंह यांनी चन्नी यांचा पराभव केला आहे. तर भदौर मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या लाभ सिंग अगोक यांनी त्यांचा पराभव केला.
त्याचबरोबर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली यांनी त्यांना धोबीपछाड करत पराभूत केले आहे.
– उत्तराखंडमध्ये “बंगाल पॅटर्न!!”
उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. मात्र असे असताना उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजप उमेदवार मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी खटिमा मतदार संघातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी त्यांना धूळ चारली आहे. तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना या निवडणुकीतही मोठा झटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
Mamata – Channi – Dhami bengal pattern
महत्त्वाच्या बातम्या
- UP ELECTION RESULT LIVE : भगवाधारी ..शेतकरी आंदोलन, महागाई-बेरोजगारी सर्वांवर भारी ! ना प्रियंका गांधींचे ‘नाक’ ना मायावतींची ‘जात’ सगळेच सुपर फ्लॉप…फक्त मोदी- योगिराज…
- निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात ; सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब
- आजपासून विद्यापीठात पुन्हा हेरिटेज वॉक सुरू
- घरफाेडी गुन्हेगारांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त