• Download App
    INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!! Mamata broke the INDI alliance in Bengal

    INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली, केरळात डाव्यांनी फोडली आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी मोडली अशी सध्याची INDI आघाडीची अवस्था आहे. Mamata broke the INDI alliance in Bengal

    लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसला एकही जागा न सोडता सर्व 42 जागा लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसला आणि डाव्या पक्षांनी तिथे स्वतंत्रपणे आघाडी करून अथवा वेगवेगळे लढावे लागणार आहे.

    उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला 80 पैकी फक्त 11 जागा सोडण्याची तयारी दाखवली, पण काँग्रेसला ते मान्य नसल्याने अखिलेश यादव यांनी परस्पर समाजवादी पार्टीचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली. अखिलेश यांनी भारतीय लोक दलाला 7 जागा देऊन उरलेल्या सर्व 73 जागांवर लढायची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी 16 उमेदवार जाहीर देखील करून टाकले आहेत.

    केरळमध्ये डाव्या कम्युनिस्ट पक्षांनी काँग्रेसला धुत्कारले आहे. बहुतेक राज्यांमध्ये आम्ही सामान्य उमेदवार उभे करू शकू आणि चर्चा अंतिम टप्प्यात आहे. बंगालमध्ये, INDI मित्रपक्ष एकत्र आल्यास भाजपसाठी फायदेशीर ठरेल कारण तिथे प्रचंड सत्ताविरोध आहे. केरळमध्ये काँग्रेस पक्ष एलडीएफ सरकारबद्दल नकारात्मक आणि लोकशाही विरोधी दृष्टिकोन अवलंबत आहे आणि मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहे. केंद्र सरकारच्या कारभारावर गप्प आहे. केरळच्या अधिकारांवर घाला घातल्याने भाजपला राज्य सरकारच्या विरोधात डावपेच करण्यात मदत होते. केरळची जनता काँग्रेस पक्षाचा हा विघटनकारी दृष्टिकोन नाकारेल, असे वक्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केले.

    येचुरी यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे खासदार के. पी. सुरेश यांनी प्रत्युत्तर दिले. केरळ मधली जनता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कारभाराला कंटाळली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याच कुटुंबाचा भ्रष्ट कारभार केरळात सुरू आहे. डाव्या पक्षांची फक्त केरळमध्येच सत्ता उरली आहे. बंगाल किंवा बाकी कुठल्याही राज्यांमध्ये डाव्या पक्षांना भवितव्य देखील उरलेले नाही. त्यामुळे काँग्रेस केरळात डाव्या पक्षा लढा उभारेल सीताराम येचुरी यांच्यासाठी फक्त केरळ हाच आधार उरला असल्याने ते काँग्रेस विरोधात बोलत आहेत, पण केरळमध्ये देखील डावे पक्ष आता सत्तेबाहेर होतील, असे उत्तर खासदार सुरेश यांनी दिले.

    त्यामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ केरळमध्ये देखील INDI आघाडी संपुष्टात आल्यात जमा आहे. या तीन राज्यांमध्ये INDI आघाडीत जागा वाटपाची चर्चा होण्याची शक्यता उरलेली नाही.

    Mamata broke the INDI alliance in Bengal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रियांका गांधी + रोहित पवारांची प्रवृत्ती सारखीच; न्यायाधीशांवर शिंतोडे उडवी!!

    Home Minister Shah : अंतर्गत सुरक्षेबाबत संसदेत उच्चस्तरीय बैठक; NSA डोभाल यांनी गृहमंत्री शहांची भेट घेतली, IB संचालकही होते उपस्थित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले; विचारले- तुम्हाला कसे कळले, चीनने जमीन बळकावली? खरे भारतीय असता तर असे म्हटले नसते