वृत्तसंस्था
चेन्नई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्याशी बिगर राजकीय चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी या आज चेन्नईमध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल एल. गणेशन यांच्या मोठ्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकात्याहून आल्या होत्या. Mamata Banerjee’s M in Chennai. K. Non-political talks with Stalin
या कार्यक्रमानंतर ममता बॅनर्जी यांनी एम. के. स्टाइलिश यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याची अटकळ विविध प्रसार माध्यमांनी बांधली आहे. सध्या भारतीय राजकारणाच्या वातावरणात विरोधी ऐक्याची चर्चा जोरावर आहे. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे नेते आपापल्या परीने विरोधी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ममता बॅनर्जी देखील आघाडीवर आहेत.
या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी एम. के. स्टालिन यांची भेट घेणे याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये विरोधी ऐक्याविषयी चर्चा झाल्याची अटकळ प्रसार माध्यमांनी बांधली. परंतु ही अटकळ ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावली.
दोन राजकीय नेते फक्त राजकारणावरच चर्चा करतात असे समजायचे काही कारण नाही. मी एका खाजगी कार्यक्रमासाठी चेन्नईत आले होते. स्टालिन हे माझ्या भावासारखे आहेत. त्यांना भेटल्याशिवाय मी परत कोलकत्याला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मी त्यांना भेटायला आले आणि आम्ही विविध विषयांवर पण राजकारण सोडून चर्चा केली, असे ममता बॅनर्जी यांनी स्टालिन यांच्या निवासस्थानी त्यांच्यासह पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Mamata Banerjee’s M in Chennai. K. Non-political talks with Stalin
महत्वाच्या बातम्या
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा
- लिबरल्सना राहुल गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण; बॉलिवूड पासून दूर पूजा भट्ट भारत जोडो यात्रेत सामील
- दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या वारसांसाठी मेडिकलच्या जागा राखीव; केंद्र सरकारचा निर्णय
- सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज