• Download App
    महिला म्हणून लाज आणणारे ममता बॅनर्जी यांचे असंवेदनशील वक्तव्य, १४ वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर म्हणाल्या अफेअर तर नव्हतं ना?|Mamata Banerjee's insensitive statement shame as a woman, after the death of a 14-year-old girl due to rape said was it not an affair?

    महिला म्हणून लाज आणणारे ममता बॅनर्जी यांचे असंवेदनशील वक्तव्य, १४ वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर म्हणाल्या अफेअर तर नव्हतं ना?

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : महिला म्हणून लाज आणणारे असंवेदनशील वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. एका 14 वर्षाच्या मुलीचा बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर तिचे अफेअर तर नव्हते ना असा लाजीरवाणा सवाल केला.Mamata Banerjee’s insensitive statement shame as a woman, after the death of a 14-year-old girl due to rape said was it not an affair?

    पश्चिम बंगालमधील नादिया येथे 14 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, एका अल्पवयीन मुलीचा बलात्कारामुळे मृत्यू झाल्याची गोष्ट सांगितली जात आहे, त्याला तुम्ही बलात्कार म्हणाल का? ती मुलगी गरोदर का की तिचे अफेअर होते? हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला? त्यांनी एकाला अटक केलीय आणि मला सांगण्यात आलं आहे



    की मुलीते मुलासोबत प्रेमसंबंध होते. असे बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या आहेत.5 एप्रिल रोजी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती जिथे तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

    कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या दबावाखाली मुलीचे शवविच्छेदन न करता जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याच तृणमूल काँग्रेसचे नेते ब्रज गोपाल गोआला यांच्या 21 वर्षीय मुलावर मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

    घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणावर सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, मुलीचा मृत्यू 5 एप्रिलला झाला होता, मात्र पोलिसांना 10 एप्रिलला याची माहिती मिळाली. 5 एप्रिल रोजी मुलीचा मृत्यू झाला असता, तर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस तक्रार का दिली नाही? कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, तर पोलिस पुरावे कुठून आणणार?

    Mamata Banerjee’s insensitive statement shame as a woman, after the death of a 14-year-old girl due to rape said was it not an affair?

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!