• Download App
    महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जींचं पहिली प्रतिक्रया, म्हणाल्या.... Mamata Banerjee's first reaction after Mahua Moitra's candidacy was cancelled

    महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जींचं पहिली प्रतिक्रया, म्हणाल्या….

    भाजपावर साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत?

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी रद्द करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदार महुआ मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव ठेवला होता, तो सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाला. Mamata Banerjee’s first reaction after Mahua Moitra’s candidacy was cancelled

    कॅश फॉर क्वेरी म्हणजेच पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी महुआवर ही कारवाई करण्यात आली आहे. महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही महुआच्या समर्थनार्थ मोठी गोष्ट सांगितली आहे.

    महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आल्यावर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे भाजपचे सूडाचे राजकारण आहे, त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. हा अन्याय असून महुआ लढाई जिंकेल, जनता तिला न्याय देईल, असे ममता म्हणाल्या.

    भाजपवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. महुआ मोईत्रा परिस्थितीचा बळी आहे. मी या कारवाईचा तीव्र निषेध करते, हे लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. आमचा पक्ष इंडिया आघाडीसोबत एकत्र लढेल, असे ममता म्हणाल्या आहेत.

    Mamata Banerjee’s first reaction after Mahua Moitra’s candidacy was cancelled

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा