Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या सोमवारपासून दिल्ली दौर्यावर आहेत. 26 जुलै रोजी ममता 5 दिवसांच्या दौर्यावर दिल्लीला जात आहेत. यादरम्यान ममता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतील. 28 जुलै रोजी पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्यात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Mamata Banerjee will camp in Delhi for 5 days from July 26, is there any preparation for 2024
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या सोमवारपासून दिल्ली दौर्यावर आहेत. 26 जुलै रोजी ममता 5 दिवसांच्या दौर्यावर दिल्लीला जात आहेत. यादरम्यान ममता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतील. 28 जुलै रोजी पंतप्रधान मोदी आणि ममता यांच्यात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतील. केवळ सोनियाच नव्हे तर ममता विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनाही भेटू शकतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीशीही ममतांच्या या भेटीचा संबंध जोडला जात आहे.
‘एबार शपथ, चलो दिल्ली’
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल कॉंग्रेसचे मुखपत्र ‘जागो बांगला’ वरदेखील ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ अर्थात या वेळी शपथ, चलो दिल्ली या नव्या घोषणेने पुन्हा सुरू झाले आहे. ममतांच्या भेटीचा संबंध या घोषणेशी जोडला जात आहे. 5 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येत असलेल्या ममता विरोधी शिबिराच्या अनेक खासदारांसह बैठक घेतील. यासह शरद पवार यांनी पुकारलेल्या गैर-भाजप नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीही भाग घेऊ शकते.
2024 साठी सज्ज!
ममता बॅनर्जी 26 जुलै रोजी दुपारी दिल्लीला पोहोचत आहेत. येथे त्या प्रथम संसद भवनात जातील, त्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याचा कार्यक्रम आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत बैठक. याच बैठकीत 2024 च्या लढाईची रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
Mamata Banerjee will camp in Delhi for 5 days from July 26, is there any preparation for 2024
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : स्टील इंडस्ट्रीला मिळणार गुंतवणुकीचे पंख, नव्या PLI मुळे निर्माण होणार 5 लाखांहून जास्त रोजगार
- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-रायगडसह अनेक भाग जलमय, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक
- Monsoon Session : तृणमूल खासदाराचे संसदेत अभद्र वर्तन, आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातली निवेदनाची प्रत फाडली
- आंदोलक शेतकऱ्यांना मीनाक्षी लेखी का म्हणाल्या मवाली? वाचला आंदोलकांच्या गुन्ह्यांचा पाढा!
- दैनिक भास्करवरील प्राप्तिकर छाप्यांबाबत केंद्राचे स्पष्टीकरण, ठाकूर म्हणाले- एजन्सी आपले काम करतेय, आमचा हस्तक्षेप नाही