• Download App
    पक्ष गेला, चिन्ह गेले, उरले ठाकरे नाव; सगळे आले सांत्वनाला, देवा विरोधकांना पाव!! Mamata banerjee, sharad Pawar, Nitish Kumar telephoned Uddhav Thackeray, but was it a support or political placate??

    पक्ष गेला, चिन्ह गेले, उरले ठाकरे नाव; सगळे आले सांत्वनाला, देवा विरोधकांना पाव!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेले, उरले ठाकरे नाव; सगळे आले सांत्वनाला, देवा विरोधकांना पाव!!, अशी राजकीय अवस्था केवळ उद्धव ठाकरेंचीच नाही, तर बाकी विरोधकांची ही झाल्याचे आज दिसून आले आहे. Mamata banerjee, sharad Pawar, Nitish Kumar telephoned Uddhav Thackeray, but was it a support or political placate??

    उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग बरखास्तीची मागणी करून लोकशाही संपल्याचे कुमार केतकरी भाकीतही केले. पण त्याचवेळी ठाकरेंनी शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार या सगळ्यांनी फोन करून देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला पाठिंबा दिल्याचेही सांगितले.



    प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव त्यांच्या हातातून निसटून जात असताना यापैकी कोणत्याही नेत्याने प्रत्यक्षात त्यांना मदत केल्याचे दिसले नाही. कायद्याची लढाई उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच लढायची आहे. पण दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निकाल दिला, तेव्हा शरद पवारांनी त्यांना तो निकाल स्वीकारण्याचा सल्ला देऊन एक प्रकारे हात झटकून टाकले होते. त्या दिवशी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांना फोनही केले नव्हते. ते फोन त्यांनी आज केले. पण तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह निघूनही गेले होते.

    एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयावर ताबाही मिळवला होता आणि शिंदे गट आता शिवसेना भवनावर देखील दावा सांगणार अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवन गाठत शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्याला ममता बॅनर्जी, नितीश कुमार, शरद पवार यांचे फोन आल्याचे सांगितले. पण या तीनही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दोन दिवसांनी फोन करून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्याचे दिसले आहे.

    शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाची लढाई उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात हरले. आता ते कायदेशीर लढाईसाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. ती लढाई त्यांना एकट्याला मुलगा आदित्य याच्यासह लढायची आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि शरद पवार यांचे फोन हे पाठिंब्यासाठी होते की राजकीय सांत्वनासाठी??, हा मूळातला प्रश्न आहे. हा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्याचे उत्तर दिले नाही.

    Mamata banerjee, sharad Pawar, Nitish Kumar telephoned Uddhav Thackeray, but was it a support or political placate??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!