• Download App
    देशात INDI लढेल, पण बंगालमध्ये तृणमूळच लढेल, तृणमूळ बरोबर एका टेबलवर बसायची Left ची औकात नाही!! Mamata banerjee drags out INDI alliance Congress and left out of bengal

    देशात INDI लढेल, पण बंगालमध्ये तृणमूळच लढेल, तृणमूळ बरोबर एका टेबलवर बसायची Left ची औकात नाही!!

    TMC नेते कुणाल घोष यांनी काढले वाभाडे

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तरुणामुळे काँग्रेस पक्षाने INDI आघाडीला पश्चिम बंगाल बाहेरच हाकलून दिले आहे. INDI आघाडी संपूर्ण देशात लढेल, पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच भाजपची टक्कर घेईल. तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांबरोबर एका टेबलवर बसण्याची Left अर्थात डाव्या पक्षाच्या नेत्यांची औकात पण नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये तृणमूळ काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांनी डावे पक्ष आणि INDI आघाडी यांचे पुरते वाभाडे काढले. Mamata banerjee drags out INDI alliance Congress and left out of bengal

    INDI आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जींनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करून काँग्रेस आणि बाकीच्या नेत्यांच्या खुर्च्यांखाली राजकीय बॉम्ब लावलेच होते, पण त्या पलीकडे जाऊन 31 डिसेंबर पर्यंत INDI आघाडीने आपापसातले जागावाटप पूर्ण करावे, असा लवंगी फटाकाही त्यावर लावून ठेवून दिला होता. प्रत्यक्षात INDI आघाडीतल्या घटक पक्षांची औपचारिक चर्चा अजूनही सुरू झालेली नाहीच, पण त्यापूर्वीच शिवसेना विरुद्ध काँग्रेस, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस विरुद्ध डावे पक्ष अशी जागा वाटपाची खेचाखेच आणि लढाई सुरू झाली आहे.

    शिवसेनेचा ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढविण्यावर ठाम आहे, तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तुमच्या एकट्याच्या बळावर तुम्ही एकही खासदार निवडून आणू शकत नाही, असे सुनावून ठाकरे गटाला जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

    तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी देखील काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये असेच जमिनीवर आणले आहे. तृणमूळ काँग्रेस विरोधात काँग्रेस आणि डावे पक्ष 2021 मध्ये लढले, पण दोघे मिळून विधानसभेत शून्यावर पोहोचले. मतविभागणी करून त्यांनी भाजपलाच विजयासाठी मदत केली, असा आरोप कुणाल घोष यांनी केला.

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच भाजपला यशस्वी टक्कर देऊ शकेल. INDI आघाडी बंगाल बाहेर भाजपशी लढेल, असे स्पष्ट वक्तव्य कुणाल घोष यांनी करून INDI आघाडीला पश्चिम बंगाल बाहेर काढण्याच्या ममता बॅनर्जींच्या धोरणावर शिक्कामोर्तब केले.

    Mamata banerjee drags out INDI alliance Congress and left out of bengal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!