प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर टीका केल्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्याला बंगाल सरकारने अटक केली. केरळमध्ये एशिया नेट न्यूजच्या ऑफिसवर पोलिसांनी छापे घातले. एकीकडे भाजप सत्तेवर नसलेल्या राज्यांमध्ये या प्रकारच्या अत्याचार सुरू असताना लिबरल्स मात्र गप्पा आहेत. हेच ते लिबरल्स आहेत, ज्यांनी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सर्वेक्षण केल्यानंतर माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा मोठा आरडाओरडा केला होता. Mamata banerjee arrested Congress spokesman, left government raids asianet office in kozikode, but liberals kept mum!!
पश्चिम बंगालमध्ये सागरदिघी मतदारसंघात पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा काँग्रेसच्या उमेदवाराने 23 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर प्रचंड आगपाखड केली. त्यांना काँग्रेसचे प्रवक्ते कौस्तव घोष यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र कौस्तव घोष यांना बंगाल पोलिसांनी पहाटे 3.00 वाजता त्यांच्या घरातून उचलून अटक केली. त्यावर एकाही लिबरल नेत्याने अथवा प्रवक्त्याने आवाज उठवला नाही.
तशीच घटना डाव्यांचे सरकार असलेल्या केरळमध्ये आज घडली. केरळच्या कोझिकोडमध्ये एशिया नेट न्यूजच्या ऑफिसवर पोलिसांनी छापे घातले. केरळच्या डाव्या सरकारच्या राजवटीत सुरू असलेल्या अत्याचारांचे रिपोर्टिंग एशिया नेट न्यूजने केले होते. विशेषतः केरळ मधल्या नार्कोटिक्सच्या तस्करीवर काही बातम्या चालवल्या होत्या. त्याविरुद्ध आमदार अन्वर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डाव्या पक्षांची विद्यार्थी संघटना एसएफआयचे विद्यार्थी एशिया नेटच्या कार्यालयात घुसून त्यांनी गोंधळ घातला होता. एशिया नेटने त्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती पण पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई केली नाही. ही घटना नोव्हेंबर 2022 मध्ये घडली होती.
त्यानंतर आज काही फेक न्युज चालवण्याच्या आरोपाखाली केरळ पोलिसांनी पुन्हा एकदा एशिया नेट न्यूजच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. मात्र या छापेमारीबद्दलही लिबरल्स गप्पा आहेत. या मुद्द्याकडे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एका ट्विट मधून लक्ष वेधले आहे. बीबीसीवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सर्वेक्षण केले तेव्हा लिबरल्स माध्यमाची गळचेपी झाली, असे ओरडत होते. पण केरळमध्ये एशिया नेट न्यूजवर पोलिसांनी छापे घातले, तेव्हा कोणीही बोलायला तयार नाही. अत्याचार उजव्यांनी करो अथवा डाव्यांनी त्याविरुद्ध बोललेच पाहिजे, असे राजदीप सरदेसाई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Mamata banerjee arrested Congress spokesman, left government raids asianet office in kozikode, but liberals kept mum!!
महत्वाच्या बातम्या
- धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले
- ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष
- भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा