विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकीकडे INDI आघाडीला 295 जागांचे बहुमत मिळण्याचा दावा केला खरा, पण त्याच वेळी त्यांनाINDI आघाडी जशीच्या तशी टिकून राहील का नाही याविषयी शंका आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीतून हीच बाब समोर आली. Mallikarjun kharge sceptical about INDI alliance durability
पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही म्हणू देत की अब की बार 400 पार, पण प्रत्यक्षात त्यांची NDA आघाडी 400 पार होणार नाही. NDA 220 च्या आत आटोपेल आणि INDI आघाडी 295 पेक्षा अधिक जागा जिंकलेल्या असेल, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
आम आदमी पार्टीचे काँग्रेस लोकसभा निवडणुकीपुरतेच नाते आहे भाजपचा पराभव करण्याचा दोन पक्षांचा समान अजेंडा आहे दोन्ही पक्षांची मैत्री तेवढ्यापुरतीच कायम आहे, असे वक्तव्य दिल्लीचे तुरुंगात गेलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील INDI आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला होता.
या पार्श्वभूमीवर INDI आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न विचारल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, चार जून नंतर देशातली राजकीय परिस्थिती बदललेली असेल. INDI आघाडीला बहुमत मिळवून आम्ही सरकार स्थापन करू. पण INDI आघाडीत नेमके कोणते पक्ष राहतील??, कोणते पक्ष बाहेरून पाठिंबा देतील?? किंवा कोणते पक्ष आघाडीतून बाहेर निघून जातील??, हे 4 जून नंतरच ठरेल.
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा काँग्रेसला या निवडणुकीत भरपूर फायदा झाला. राहुल गांधी मणिपूरला गेले. तिथल्या दंगलग्रस्त जनतेचे त्यांनी अश्रू पुसले. ज्या मणिपूरमध्ये जायला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरत होते, तिथे राहुल गांधी गेले. राहुल गांधींनी देशभरात पायी फिरून करोडो लोकांची संपर्क साधला उच्चशिक्षित लोकांशी संवाद साधला त्याचा अनुकूल परिणाम लोकशाहीच्या निवडणुकीत काँग्रेसला बघायला मिळेल, असा दावाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
4 जून नंतर मल्लिकार्जुन खर्गे यांची नोकरी जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या अपयशाचे खापर गांधी परिवार खरेदी यांच्या डोक्यावर फोडेल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. अमित शाहांना उत्तर देताना खर्गेंनी आपण कुणाचे नोकर असल्याचे नाकारले. आम्ही राजकारणात काही विशिष्ट तत्त्व मांडण्यासाठी आलो आहोत. ही तत्त्वे मांडतच राहू. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी आपण राजकारणातून संन्यास घेणार नाही, अशी ग्वाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.
Mallikarjun kharge sceptical about INDI alliance durability
महत्वाच्या बातम्या
- केजरीवालांचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण; 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; म्हणाले- तुरुंगातून कधी परत येईन माहीत नाही
- निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी, मागण्यांची सादर केली यादी, प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी; भाजपचीही कुरघोडी!!
- पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ‘गाडी चालवताना खूप नशेत होतो,’ अल्पवयीन आरोपीने दिली कबुली!
- अमित शहांची 150 जिल्हाधिकाऱ्यांशी कथित बातचीत; डिटेल्स शेअर करण्यासाठी जयराम रमेश यांना निवडणूक आयोगाची नोटीस!!