विशेष प्रतिनिधी
मुंबई : आकड्यांचे फुगून फुगे, दोघे महाराष्ट्रात उभे; शरद पवार म्हणाले, 35 जागा जिंकू, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 46 जागा जिंकू!! महाराष्ट्रात महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकेल?? या प्रश्नाला शरद पवार आणि मल्लिकार्जुन खडगे यांनी दिलेली ही उत्तरे!! Mallikarjun Kharge said he will win 46 seats
शरद पवारांनी तीनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकण्याचे भाकीत केले होते. महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील आणि महायुतीला 15 – 16 जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी केले होते. यापैकी राष्ट्रवादीला 10 पैकी आठ नऊ जागा काँग्रेसला 17 पैकी 10 – 12 जागा आणि उरलेल्या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील, असे पवार म्हणाले होते. पवारांच्या त्या भाकितावरून किती उदार मन पवार साहेबांचं!! त्यांनी आम्हाला 15 – 16 जागा दिल्या!!, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची खिल्ली उडवली होती.
त्यानंतर काल महाविकास आघाडीची मुंबईत महासभा झाली. या महासभेमध्ये अरविंद केजरीवालांचे भाषण झाले. आज आघाडीतल्या तीन प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार उपस्थित होते. केजरीवाल या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकले??, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट आकडा सांगूनच बडा दावा केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना अनुकूल वातावरण असल्याने आम्ही 48 पैकी 46 जागा जिंकू महायुतीला मी 0 जागा देणार नाही ते 1 – 2 जागा जिंकतील, असे उद्गार मल्लिकार्जुन खर्गे यांनी काढले. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या शेजारी बसले होते. महाराष्ट्रामध्ये भाजपने दोन पक्ष फोडून त्यांची चिन्हे पळवली, पण तरीदेखील जनता मूळ नेत्यांच्या पाठीमागे उभी आहे, असा दावा खडके यांनी केला.
Mallikarjun Kharge said he will win 46 seats
महत्वाच्या बातम्या
- मान्सूनचे शुभवर्तमान : IMDचा अंदाज 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान आगमन
- संघाचं फडकं म्हणून उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाजा अपमान!!
- स्वाती मालीवाल यांच्या जबानीनंतर दिल्ली पोलिसांमध्ये FIR दाखल; त्यात बिभव कुमारचे नाव, पण केजरीवाल अद्याप गप्प!!
- मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री आलमगीरला धक्का; कोर्टाने EDला सहा दिवसांची दिली रिमांड