• Download App
    Mallikarjun kharge names Yogi Adityanath as political heir of Narendra Modi याला म्हणतात, अनुभवी काँग्रेसी झटका; योगींना मोदींचे वारस ठरवून

    याला म्हणतात, अनुभवी काँग्रेसी झटका; योगींना मोदींचे वारस ठरवून मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला शेजारी बसलेल्याला राजकीय फटका!!

    Mallikarjun kharge

    याला म्हणतात, अनुभवी काँग्रेसी झटका; योगींना मोदींचे वारस ठरवून मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला शेजारी बसलेल्याला राजकीय फटका!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्यामुळे आली.Mallikarjun kharge names Yogi Adityanath as political heir of Narendra Modi

    पाटण्यातल्या ऐतिहासिक सदाकत आश्रमात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी असे काही वक्तव्य केले, की ज्यामुळे त्यांच्या शेजारी बसलेल्या राहुल गांधींना मोठा राजकीय फटका बसला. कारण मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्याच्या निमित्ताने त्यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवून टाकले. खर्गे यांनी मोदी आणि योगींवर टीका जरूर केली, पण योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारस ठरवून मोदींच्या नंतर योगेश पंतप्रधान होतील, अशी कबुली देऊन टाकली. त्यामुळे अर्थातच काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या शेजारी बसलेला राहुल गांधींना तो राजकीय फटका बसला.



    बिहार निवडणुकीसाठी बैठक, पण…

    वास्तविक बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर जेव्हा केव्हा होतील तेव्हा, त्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती ठरवावी या हेतूने काँग्रेसने ऐतिहासिक सदाकत आश्रमात कार्यकारणीची बैठक घेतली. त्या बैठकीला सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते हजर राहिले. या बैठकीत अर्थातच काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य भाषण केले. या भाषणातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडताना योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय वारस ठरवून टाकले. योगी आदित्यनाथ स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस म्हणवतात, पण ते उत्तर प्रदेशात जातीय रॅलींवर बंदी घालतात. आरक्षणाच्या विरोधात लेख लिहितात. एकीकडे केंद्र सरकार काँग्रेसच्या दबावामुळे देशात जातनिहाय जनगणना करणार आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस म्हणणारे योगी जातीय रॅलींवर बंदी घालत आहेत, असे शरसंधान खर्गे यांनी साधले.

    प्रणवदा + नटवर सिंह यांच्या पावलावर पाऊल

    पण मल्लिकार्जुन खर्गे यांनी या शरसंधानातून योगी आदित्यनाथ यांना परस्पर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारस ठरवून टाकले. त्यासाठी ना त्यांनी राहुल गांधींची परवानगी घेतली, ना कुठल्या भाजप नेत्याची परवानगी घेण्याच्या फंदात ते पडले. देशातले एकूण राजकीय वातावरण पाहून मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातला अनुभवी काँग्रेस नेता “जागा” झाला आणि त्यांनी देशाच्या राजकीय भविष्याचा वेध घेतला. यामध्ये त्यांनी प्रणव मुखर्जी, नटवर सिंह यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांच्या पावलांवर पाऊल टाकले. प्रणव मुखर्जी आणि नेटवर सिंग या दोन्ही नेत्यांनी आयुष्यभर काँग्रेसचे राजकारण केले. काँग्रेसकडून मिळालेली पदे भोगली. परंतु, त्यांचे स्वतःचे सक्रिय राजकारण संपल्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये आता फारसा दम उरला नाही याची जाणीव झाली. त्याउलट भाजपमध्ये नरेंद्र मोदींचे नेतृत्व उभरते आहे हे त्यांच्या लक्षात आले. अर्थातच प्रणव मुखर्जी आणि नटवर सिंह या दोघांनी काँग्रेस कधी सोडली नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मते व्यक्त करणे देखील त्यांनी कधी थांबविले नाही. काँग्रेसमध्ये राहून सत्ता उपभोगून त्यांना जे परिपक्व राजकीय आकलन झाले होते, ते या दोन्ही नेत्यांनी निर्भीडपणे मांडले होते.

    – खर्गे चतुर आणि अनुभवी

    मल्लिकार्जुन खर्गे यांनी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारस ठरवून नेमके तेच केले. मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा ८६ वर्षांचे नेते आहेत. काँग्रेसच्या राजकारणात ते पक्के आणि पुरते मुरलेत. सत्तेचे सगळे फायदे – तोटे त्यांनी अनुभवलेत. सत्तेचे सगळे निकष त्यांना पुरते माहिती आहेत. सत्तेच्या कुठल्याच निकषांमध्ये राहुल गांधी बसत नाहीत, तर योगी आदित्यनाथ अधिक चपखलपणे बसतात, याची मल्लिकार्जुन खर्गेंना जाणीव झाली आहे. पण तसे सकारात्मक बोलता येणार नाही हेही त्यांना माहिती आहे. म्हणूनच टीकास्त्र सोडण्याच्या निमित्ताने त्यांनी योगी आदित्यनाथ यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस ठरविले.

    मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये राहून आपल्याला मिळालेल्या प्रचंड राजकीय अनुभवाचा एक वेगळाच फटका राहुल गांधींना काँग्रेस कार्यकारिणीच्या भर बैठकीत देऊन टाकला. पण राहुल गांधी आणि सगळ्या गांधी परिवाराची गोची अशी की त्यांना त्यावर काही बोलताही आले नाही!!

    Mallikarjun kharge names Yogi Adityanath as political heir of Narendra Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मानहानी गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकावी; जेएनयूच्या माजी प्राध्यापकांना नोटीस

    महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडाला तरी राजकारण सुटत नाही; दमबाजी करण्याची हौस काही भागत नाही!!

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- हायकोर्टाचे काही न्यायाधीश खटले पुढे ढकलतात, हे धोकादायक