‘रबर स्टॅम्प अध्यक्ष’ संबोधत भाजपाने साधला निशाणा ; पाहा नेमकं काय घडलं?.
विशेष प्रतिनिधी
तेलंगणा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘रबर स्टॅम्प अध्यक्ष’ असं संबोधलं आहे. कारण, तेलंगणातील एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना, खर्गे हे उपस्थितांवर भडकले अन् त्यांना गेट आउट म्हणाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. Mallikarjun Kharge angry in a rally at Telangana and told the crowd to get out
सभेतील नागरिकांच्या गोंधळामुळए खर्गे भडकले आणि त्यांनी थेट माईकवरच, ”गप्प बसा…जर ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर बाहेर जा. अशाप्रकारे ओरडू नका, तुम्हाला समजत नाही का ही जी सभा सुरू आहे त्यामध्ये एक ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा नेता बोलतोय आणि तुमच्या तोंडात येईल ते तुम्ही बोलत आहात. जर ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर आपल्या ठिकाणी जा.” असे म्हटले. ज्यावरून आता त्यांना आणि काँग्रेसला ट्रोल केले जात आहे.
या घटनेवरून भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, ”खर्गेंना त्यांच्या सर्वच सार्वजिनिक सभांमध्ये अपमानित केले जाते आणि मग ते असहायपणे आपल्याच कार्यकर्त्यांवर ओरडतात जे त्यांचा सन्मान करत नसतात. गांधी परिवाराने त्यांना एक रबर स्टॅम्प अध्यक्ष बनवलं आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर, राजस्थानमधील सर्व जाहिरातींमध्ये त्यांचे फोटो एक गायबच झाले आहेत किंवा मग स्टॅम्पच्या आकाराएवढे कमी झाले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आणि गेहलोत यांचे फोटो मोठे करून झळकवले गेले आहेत. एक दलित असल्याने काँग्रेस खर्गेंचा अपमान करत आहेत का?”
दरम्यान याच सभेत काँग्रेसने तेलंगणासाठीच्या सहा निवडणूक आश्वासनांची घोषणाही केली. ज्यामध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा, दर महिन्याला महिलांना 2500 रुपये, 500 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर आणि प्रत्येक घरात 200 यूनिट वीज मोफत देण्यांच्या आश्वासनांचा समावेश आहे.