• Download App
    ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन! वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! malini rajurkar passed away

    ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन! वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भारतीय अभिजात संगीतातील, ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ शास्त्रीय गायिका, टप्पा आणि ख्याल गायकीवर विलक्षण प्रभुत्व असलेल्या मालिनी राजूरकर यांचं वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धपकाळामुळे बुधवारी रात्री निधन झालं. malini rajurkar passed away

    मालिनी राजूरकर या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जात असे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं असंख्य शास्त्रीय संगीताच्या चाहत्यांना, जाणकारांना मोठा धक्का बसला आहे.

    त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, बुधवारी दुपारी सव्वाचार वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यामागे त्यांच्या परिवारामध्ये दोन मुली आणि परिवार आहे.

    मालिनी राजूरकर यांनी देहदान केलं असल्याने, त्यांचं पार्थिव उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय विद्यादेवधर यांनी दिली.मालिनी राजूरकर यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले होते. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास, त्यांना २००१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं तर २००८ मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

    मालिनी राजूरकर यांची नरवर कृष्णा समान आणि पांडूनृपती जनक जया ही गाणी श्रोत्याच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

    मालती ताईंनी पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सव, मुंबईतील गुणीदास संमेलन, हृदयेश फेस्टिवल , ग्वाल्हेर येथील तानसेन समारोह, दिल्ली येथील शंकरलाल फेस्टिव्हयलं या बरोबरचं देश-विदेशातील अनेक मैफिली त्यांनी गाजवल्या. मालिनी राजूरकर यांच्याविषयी आणखी माहिती द्यायची झाल्यास त्यांचे बालपण हे राजस्थानमध्ये गेले. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ सालचा. त्यांनी अजमेर येथील संगीत महाविद्यालयातून संगीताचे शिक्षण घेतले. यावेळी त्यांना गोविंदराव राजूरकर आणि त्यांचे पुतणे वसंतराव राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

    malini rajurkar passed away

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Election Commission : ‘वोट चोरी’वर आयोगाने म्हटले- असे घाणेरडे शब्द वापरणे टाळा; हा कोट्यवधी मतदारांवर हल्ला

    भारताची BRICS देशांना संपूर्ण व्यापार कृपया चलनात करायची मुभा; अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला दिला धक्का!!

    Air Force : 86व्या शौर्य पुरस्काराची घोषणा; ऑपरेशन सिंदूरमधील 9 लढाऊ वैमानिक-अधिकाऱ्यांना वीर चक्र