• Download App
    Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 19वा साक्षीदार उलटला, आरोपींना ओळखण्यास दिला नकार|Malegaon Blast Case: 19th witness reversed in Malegaon bomb blast case, accused denied

    Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 19वा साक्षीदार उलटला, आरोपींना ओळखण्यास दिला नकार

    मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू असली तरी काही काळापासून या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदार सतत पलटत आहेत. म्हणजेच साक्षीदार एकतर त्यांचे म्हणणे नाकारत आहेत किंवा आरोपींना ओळखण्यास नकार देत आहेत. आता या प्रकरणातील 19वा साक्षीदारही आपल्या म्हणण्यावरून उलटला आहे. 243 क्रमांकाचा साक्षीदार न्यायालयात हजर केला असता त्याने आरोपींना ओळखण्यास नकार दिला.Malegaon Blast Case: 19th witness reversed in Malegaon bomb blast case, accused denied


    वृत्तसंस्था

    मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू असली तरी काही काळापासून या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदार सतत पलटत आहेत. म्हणजेच साक्षीदार एकतर त्यांचे म्हणणे नाकारत आहेत किंवा आरोपींना ओळखण्यास नकार देत आहेत. आता या प्रकरणातील 19वा साक्षीदारही आपल्या म्हणण्यावरून उलटला आहे. 243 क्रमांकाचा साक्षीदार न्यायालयात हजर केला असता त्याने आरोपींना ओळखण्यास नकार दिला.

    आरोपींना ओळखण्यास नकार

    2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या आरोपींच्या ओळखीसाठी साक्षीदार सादर केले जातात. गुरुवार, 24 मार्च रोजी न्यायालयात हजर झालेल्या साक्षीदाराने ईश्वराची शपथ घेऊन केवळ तेथे उपस्थित असलेले कर्नल पुरोहित यांना ओळखले. साक्षीदार म्हणाला की, मी इतर कोणत्याही आरोपीला ओळखत नाही किंवा मी त्यांना कधीही भेटलो नाही. साक्षीदाराने आपल्या जुन्या विधानाबाबत सांगितले की, मला त्याबद्दल काहीही आठवत नाही.



    काय आहे संपूर्ण प्रकरण?

    मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास NIA करत आहे. तसेच एनआयए न्यायालयातच सुनावणी सुरू आहे. ज्यामध्ये साक्षीदार सतत आपल्या म्हणण्यापासून दूर जात आहेत. वास्तविक हे प्रकरण 29 सप्टेंबर 2008 चे आहे. मालेगावात जेव्हा अचानक बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले होते. ही स्फोटके मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्रथम तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता, परंतु 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत.

    या प्रकरणात प्रज्ञा ठाकूरसह काही जणांना जामीन मिळाला आहे, तेव्हापासून ते तुरुंगाबाहेर आहेत. यासोबतच MCOCA, UAPA आणि शस्त्रास्त्र कायद्यातील अनेक गंभीर कलमेही हटवण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणात 200 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. ज्यांना वेगवेगळ्या वेळी न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, आतापर्यंत 19 साक्षीदार त्यांच्या जबाबावरून उलटले आहेत.

    Malegaon Blast Case: 19th witness reversed in Malegaon bomb blast case, accused denied

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी