• Download App
    Maldives पंतप्रधान माेदींसाेबतचा वाद भाेवला, मालदीव दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर

    Maldives : पंतप्रधान माेदींसाेबतचा वाद भाेवला, मालदीव दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्ण्णी केल्यानंतर भारतीय प्रवाशांनी मालदीवच्या पर्यटनावर स्वच्छेने बहिष्कार घातला हाेता. त्याचे परिणाम आता दिसून लागले आहेत. मालदीव दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर असून येथील डाॅलर्सचा साठा संपुष्ठात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली हाेती. Maldives

    यावेळी मालदीवच्या मंत्र्यांनी त्यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली हाेती. त्याविराेधात भारतात संतापाची लाट पसरली हाेती. वास्तविक भारताकडून मालदीवला सर्व प्रकारची मदत हाेते. एका अर्थाने भारताच्या मदतीवरच हा देश अवलंबून आहेहे.  भारत मालदीवला त्यांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतो. तांदूळ, मसाले, फळे, भाज्या, पोल्ट्री आणि मुळात देशातील प्रत्येक खाद्यपदार्थ अर्थातच सीफूड वगळता मालदीवला भारत  पुरवतो.


    MVA : महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात; पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात, ना तोट्यात!!


    केवळ दैनंदिन औषधेच नव्हे तर सर्व गंभीर आजारावरची आणि जीवन वाचवणारी औषधे भारत मालदीवला पुरवतो. सिमेंट, दगड आणि चिरे आणि मुळात घर किंवा पूल किंवा शाळा किंवा रुग्णालय बांधण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट भारत मालदीवला देत असतो. मालदीवचे विद्यार्थीही भारताच शिकायला येतात.भारताकडून इतकी मदत हाेत असताना देशाच्या पंतप्रधानांविेषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारतीय नाराज झाले.

    मालदीवच्या पर्यटनावर अघाेषित बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्याचा परिणाम मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. मालदीव मॉनेटरी अथॉरिटी (MMA) ने अर्थ मंत्रालयाला इशारा दिला असून  देशातील वापरण्यायोग्य डाॅलर्सचा साठा संपला असल्याचे म्हटले आहे. मालदीवच्या इतिहासात पहिल्यांदाच डाॅलर्सचा  साठा नकारात्मक झाला आहे. यामुळे मालदीवला आता आंतरराष्ट्रीय बाजारातून जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अशक्य झाले आहे. एका अर्थाने देश दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर आहे.

    Maldives on brink of bankruptcy after dispute with PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले