विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटावरचे फोटो शेअर केले. लक्षदीपच्या समुद्रकिनाऱ्यांचे बहारदार वर्णन केले. त्यातून लक्षदीपच्या पर्यटनाला चालना मिळाली…, पण हादरे भारत विरोधी सरकार आलेल्या मालदीवला बसले. त्यातून मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध घृणास्पद टिपण्णी करणारी ट्विट केली, पण त्याचाही हादरा मालदीवलाच बसला. कारण त्यानंतर ताबडतोब #BoycottMaldives
मग ट्रेंड सुरू झाला. त्याची धग आंतरराष्ट्रीय पातळीवर मालदीव सरकारला जाणवली आणि मालदीव सरकारने आपले 3 मंत्री घरी पाठवले. मरियम शिऊना, माल्शा आणि हसन जिहाद ही या 3 मंत्र्यांची नावे आहेत.Maldives govt suspends 3 ministers over racist remarks against PM Modi for Lakshadweep post: Reports
मालदीव मध्ये चारच महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये चीनधार्जिण्या मोहम्मद मोईज्जू यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी भारतीय सैन्य मालदीवमधून परत पाठवण्याचे कारस्थान रचले. चीनच्या जाळ्यात अडकण्याचा हा प्रकार होता. यातून चीन हिंदी महासागरात भारताला काटशह देण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्यक्षात मालदीवची अर्थव्यवस्था केवळ पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे आणि यातले बहुसंख्य पर्यटक हे प्रामुख्याने भारतीयच आहेत, तरी देखील मालदीवच्या चीनधार्जिण्या सरकारने भारत विरोधी कारवाया सुरू केल्या होत्या.
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याने मालदीवच्या या कारवायांना खऱ्या अर्थाने चाप बसला. मोदींनी लक्षद्वीप साठी 1500 कोटी रुपयांची विकास योजना तर दिलीच, पण तिथल्या समुद्रकिनाऱ्यांचे फोटो शेअर करून त्याचे बहारदार वर्णन केले. यातून लक्षद्वीपच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले, पण मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला त्याचा फटका बसला. त्यामुळे मालदीवच्या मंत्र्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली. भारतातले समुद्रकिनारे अस्वच्छ आहेत. तिथल्या हॉटेलमधल्या खोल्यांमध्ये घाणेरडा वास येतो, अशी टिप्पणी मंत्र्यांनी केली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवच्या प्रतिनिधींना बोलवून ताबडतोब त्याबद्दल समज दिली आणि मालदीव सरकारला हादरा बसला. हे प्रकरण फारच आपल्या अंगलट आले आहे हे पाहून अध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांच्या सरकारने 3 मंत्र्यांना बडतर्फ करून भारताचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण #BoycottMaldives ट्रेंड मुळे मालदीवचा पर्यटन बाजू फटका बसायचा तो बसलाच आहे!!
Maldives govt suspends 3 ministers over racist remarks against PM Modi for Lakshadweep post: Reports
महत्वाच्या बातम्या
- एआययूडीएफ प्रमुखांचा मुस्लिमांना 20 ते 26 जानेवारीपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला, भाजपचा पलटवार- अजमल-ओवैसींनी द्वेष पसरवला
- सदोष औषधे परत मागवल्याबद्दल ड्रग्ज अथॉरिटीला माहिती द्यावी लागेल; सरकारची कंपन्यांना सूचना- WHO स्टँडर्डनुसार टेस्ट करा
- खोटं बोलून, युती तोडून उद्धव ठाकरे टुणकन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर; मुख्यमंत्री शिंदे “मिशन 48” मोहिमेवर!!
- गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, आता राहण्यायोग्य नाही