• Download App
    वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!! । Malayalam director Ali Akbar to renounce Islam and embark Hinduism

    वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!!

    वृत्तसंस्था

    तिरुअनंतपुरम : इस्लाममधील असहिष्णुता वादाला कंटाळून वासिम रिजवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्यांच्या पाठोपाठ आता मल्याळी दिग्दर्शक अली अकबर हे देखील इस्लामचा त्याग करून हिंदूधर्म स्वीकारणार आहेत. Malayalam director Ali Akbar to renounce Islam and embark Hinduism

    भारताचे पहिले सैन्य दल प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक लोकांनी हास्य ईमोजी टाकून आनंद व्यक्त केला. हे सगळे लोक मुस्लीम होते. परंतु, मुस्लिम धर्मगुरुंनी त्यावर अजिबात खेदही व्यक्त केला नाही. याच्या निषेधार्थ दिग्दर्शक अली अकबर हे इस्लामचा त्याग करून हिंदूधर्म स्वीकारणार आहेत. यापुढे आपले नाव रामसिंग असेल, असे त्यांनी जाहीर देखील केले आहे. फेसबुक लाईव्ह वरून त्यांनी संवाद साधत आपली व्यथा बोलून दाखवली. जनरल बिपिन रावत यांच्यासारखा देशभक्त लष्करी सर्वोच्च अधिकारी मृत्यू पावल्यानंतर काही लोकांनी तो मृत्यू सेलिब्रेट केला. ते बहुतेक लोक मुस्लीम होते. परंतु मुस्लिमांमधल्या सर्वोच्च धर्मगुरूंनी त्याविषयी हे खेदही प्रदर्शित केला नाही.



    याचा अर्थ ते किती असहिष्णू आहेत, असाच होतो त्यामुळे इस्लामचा त्याग करून मी यापुढे भारतीय म्हणूनच ओळखला जाईन, असे आली अकबर यांनी स्पष्ट केले आहे. अली अकबर पत्नीसह हिंदू धर्म स्वीकारणार आहेत त्यांच्या दोन कन्यांना कोणता धर्म स्वीकारायचा याचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अली अकबर हे राष्ट्रीय पारितोषिक विजेते तसेच राज्य पारितोषिक विजेते मल्याळी दिग्दर्शक आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविली आहे, तसेच भाजपच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढविली आहे. परंतु भाजपशी त्यांचे त्यांनी तो पक्ष देखील सोडला आहे.

    परंतु आता जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावरून अली अकबर यांनी आता इस्लामचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. याआधी उत्तर प्रदेशातील या वक्फ बोर्डाचे प्रमुख वासिम रिजवी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आहे.

    Malayalam director Ali Akbar to renounce Islam and embark Hinduism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक