• Download App
    लोकांना काँग्रेसमध्ये आणा अन् सोने जिंका; तामिळनाडूतील जिल्हाध्यक्षांची कार्यकर्त्यांना ऑफर । Make people join Congress earn gold, district presidents offer to party workers in Tamil Nadu

    पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’

    join Congress earn gold : तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा विस्तार करण्याचा अनोखा मार्ग म्हणून येथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसमध्ये सर्वाधिक लोकांची नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बक्षीस म्हणून सोने घोषित केले आहे. Make people join Congress earn gold, district presidents offer to party workers in Tamil Nadu


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा विस्तार करण्याचा अनोखा मार्ग म्हणून येथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसमध्ये सर्वाधिक लोकांची नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बक्षीस म्हणून सोने घोषित केले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 77 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत दक्षिण मध्य चेन्नई जिल्हाध्यक्ष एमए मुथलकान यांनी ही घोषणा केली. मुथलकान म्हणाले की, जे कार्यकर्ते पक्षामध्ये सर्वाधिक लोक आणतील त्यांना पहिल्या क्रमांकासाठी 8 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे 4 ग्रॅम आणि 2 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या बक्षीस म्हणून देण्यात येतील. तथापि, लोकांना पक्षाचे विचार, विचारधारा पटवून देण्याऐवजी सोन्याचे आमिष दाखवून आणण्याच्या ऑफरमुळे टीकाही सुरू झाली आहे.

    2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने ‘वीथीधोरम काँग्रेस, वीदुधोरम काँग्रेस’ (प्रत्येक गल्लीत काँग्रेस, प्रत्येक घरात काँग्रेस) मोहिमेचे अनावरण केले. येथे राहुल गांधींना पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा आणि 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कठोर परिश्रम करण्याचा ठरावही पारित करण्यात आला.

    तमिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केएस अलागिरी आणि एआयसीसीचे सचिव सिरीवेल्ला प्रसाद उपस्थित होते.

    मुथलकान यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितल्यानुसार, “आधी आम्हाला आमच्या सभांना जास्तीत जास्त लोक आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागायचे, आता वाहनांची व्यवस्था करणे किंवा अतिरिक्त पैसे खर्च करणे यासारख्या कोणत्याही अतिरिक्त उपायांशिवाय 500 लोकांना येथे आणणे मला फक्त एक कॉल करूनच शक्य आहे. हे शक्य झाले कारण मी घरोघरी मोहीम राबवली. आमच्या पक्षाची विचारधारा इथल्या जनतेसमोर प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आता एक योग्य टीम आणि अजेंडा तयार केला आहे. मला खात्री आहे की, प्रत्येक गल्लीत एक काँग्रेस सदस्य आहे. जरी आम्ही या क्षेत्रातील एकूण सदस्यांपैकी 50 टक्के सदस्यांना आमच्या सर्व पक्षाच्या कार्यांसाठी मिळवून देऊ शकलो तरी हे यशस्वी होईल. कारण आम्ही त्यांना पैसे देत नाही किंवा त्यांना सभांमध्ये आणण्याची व्यवस्था करत नाही आणि ते त्यांच्या इच्छेने येत आहेत. आम्ही प्रत्येक मंडळात मोठ्या प्रमाणात सदस्यत्व मोहिमेची योजना आखत आहोत. मी काल म्हटल्याप्रमाणे सर्वाधिक संख्येने लोकांची नावनोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बक्षीस दिले जाईल.”

    Make people join Congress earn gold, district presidents offer to party workers in Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस