पीओके आमचे आहे आणि आम्ही ते घेऊच, असा निर्धारही अमित शाहांनी यावेळी व्यक्त केला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, “यापूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गोहत्येच्या घटना घडल्या होत्या. तुम्ही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, आम्ही गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू आणि सरळ करू. “Make Modi Prime Minister for the third time we punish the cow killers Amit Shahs warning
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “हे इंडी आघाडीचे लोक आज म्हणतात की POKबद्दल बोलू नका, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरताय, अरे पण मोदीजींच्या नेतृत्वात भारत एवढा मजबूत आहे की, घाबरण्याची गरज नाही. अणुबॉम्बची भीती बाळगण्याची गरज आहे, हे पीओके आमचे आहे आणि आम्ही ते घेऊ, असे म्हणत मी आज येथून निघालो.
रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले मागास प्रवर्गातील पंतप्रधान आहेत. 50-60 च्या दशकात एक चर्चा व्हायची की, लोहियाजींचा सिद्धांत देशात चालेल की नाही. मला लोहियाजींना सलाम करून सांगायचे आहे की सर्वात मागास प्रवर्गातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे.”