• Download App
    देशात दोन अपत्ये धोरण लागू करण्यासाठी कायदा करा, भाजप खासदार उदय प्रताप सिंह यांची मागणी|Make a law to implement two-child policy in the country, demands BJP MP Uday Pratap Singh

    देशात दोन अपत्ये धोरण लागू करण्यासाठी कायदा करा, भाजप खासदार उदय प्रताप सिंह यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : ‘दोन अपत्ये’ धोरण लागू करण्यासाठी कायदा करा. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार उदय प्रताप सिंह यांनी केली आहे.Make a law to implement two-child policy in the country, demands BJP MP Uday Pratap Singh

    उदय प्रताप सिंह यांनी लोकसभेत झिरो अवरमध्ये बोलताना सांगितले की, देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे घरे, रस्ते आणि इतर सर्व संसाधनांवर दबाव वाढत आहे. या देशाची भौगोलिक स्थिती 135 कोटी लोकांना सांभाळण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे येत्या काही वर्षांत काय होईल सांगता येणार नाही.



    देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणे इत्यादी विशिष्ट गोष्टींसाठी हा नियम आधीच लागू आहे. राजस्थानमध्ये जर एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त मुले असतील तर त्याला स्थानिक निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाते.

    त्याचप्रमाणे, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक निवडणुका लढवण्यापासून रोखण्याची तरतूद आहे, असे सिंह यांनी सांगितले.

    Make a law to implement two-child policy in the country, demands BJP MP Uday Pratap Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे

    Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत, घरोघरी जाऊन पडताळणी; निवडणूक आयोगाची मोहीम