• Download App
    छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश, चकमकीत 10 नक्षलवादी ठार; शस्त्रास्त्रेही जप्त|Major success of security forces in Chhattisgarh, 10 Naxalites killed in encounter; Weapons were also seized

    छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश, चकमकीत 10 नक्षलवादी ठार; शस्त्रास्त्रेही जप्त

    वृत्तसंस्था

    रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक लाइट मशीनगन, एक .३०३ रायफल, एक १२ बोअरची बंदूक, मोठ्या प्रमाणात बॅरल ग्रेनेड लाँचर, गोळे, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटली नाही.Major success of security forces in Chhattisgarh, 10 Naxalites killed in encounter; Weapons were also seized



    पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गांगलूर पोलिस ठाण्यांतर्गत लेंद्रा आणि कोरचोली गावांमध्ये ही चकमक झाली. येथे सुरक्षा दलाच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानावर होते. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आणि नंतर शोधकार्यात चकमकीच्या ठिकाणी आणखी सहा मृतदेह आढळले. नक्षलवादी दरवर्षी मार्च ते जून या काळात टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह मोहिमा राबवतात व आपल्या कारवाया तीव्र करतात. यापूर्वी २७ मार्च रोजी विजापूरच्या बासागुडा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले होते.

    Major success of security forces in Chhattisgarh, 10 Naxalites killed in encounter; Weapons were also seized

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज