2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस मध्ये राज्यांच्या पातळीवर मोठे फेरबदल होतीलच, पण त्याहीपेक्षा फार मोठा फेरबदल करण्याचे अति वरिष्ठ पातळीवरून घाटत असून ही एक प्रकारे काँग्रेसचा “राहुल गांधी प्रयोग” फसल्याची कबुली असल्याचे दिसून येत आहे!! Major shift in Congress offing, priyanka Gandhi “in”, rahul Gandhi may be “out” soon!!
कारण आता प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या फार मोठ्या पदावर विराजमान करून राष्ट्रीय राजकारणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची राजधानी नवी दिल्लीच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे.
2024 निवडणुकीच्या राजकीय नेपथ्यरचनेसाठी राहुल गांधी जोरदार प्रयत्न करीत आहेत, हे खरे. त्यासाठीच त्यांचे इंग्लंड – अमेरिका दौरेही झाले. सध्या ते लंडनमध्ये एका उद्योगपतीचा पाहुणचार घेत असल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पण त्यापलीकडे जाऊन राहुल गांधींचे राजकीय भवितव्य कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. त्यांची खासदारकी कायदेशीर कसोटीवर रद्द झाली आहे आणि पुढची लढाई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे राहुल गांधी भाजपशी टक्कर घेताना निवडणुकीच्या रण मैदानात स्वतः प्रत्यक्ष उतरू शकतील की नाही??, याविषयी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात फार मोठी शंका आहे.
कार्यकारी अध्यक्षपद शक्य
अशा स्थितीत काँग्रेससाठी दुसरा महत्त्वाचा ऑप्शन उरतो तो, प्रियांका गांधींचा. प्रियांका गांधी यांना सध्या त्या आहेत, त्यापेक्षा जास्त “पॉलिटिकली ऍक्टिव्ह” करून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बरोबरीने कार्यकारी अध्यक्ष पद देणे किंवा तशी व्यवस्था निर्माण करणे याविषयी काँग्रेसच्या अति वरिष्ठ वर्तुळात गंभीर चर्चा आहे.
रायबरेलीतून मैदानात
त्याचवेळी सोनिया गांधी थेट मार्गदर्शकाच्याच भूमिकेत जाऊन कदाचित ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून पूर्णपणे रिटायरमेंट मोडमध्ये जातील. त्यांचे 10 जनपथ मधून बस्तान हलवून सिमल्यात प्रियांका गांधींच्या बंगल्यात नेण्याची देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पण त्या दिल्लीत 10 जनपथ मध्ये राहोत अथवा सिमल्यात प्रियांका गांधींच्या बंगल्यात राहोत, त्या 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, हे मात्र निश्चित सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांचा रिकामा होणारा रायबरेली मतदारसंघ प्रियांका गांधींसाठी मोकळा करून त्यांना निवडणुकीच्या प्रत्यक्ष रण मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणात प्रियांका गांधींना तिथून निसटता का होईना पण जनमताचा कौल मिळाला आहे.
अर्थातच प्रियांका गांधी जेव्हा निवडणुकीच्या मैदानात येतील, त्या काँग्रेसच्या सर्वात प्रभावशाली नेत्या म्हणूनच. मग त्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष होवोत अथवा मल्लिकार्जुन खर्गे यांना बाजूला सारून थेट अध्यक्ष होवोत, प्रियांका गांधींचे प्रमोशन निश्चित आहे!!
सुप्रिया आणि प्रियांका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रापुरता विचार करून जशी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून राजकीय वारसाची सोय करून ठेवली, तशीच सोय सोनिया गांधी या प्रियांका गांधी यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर करू शकतात. काँग्रेसमध्ये हा फार मोठा बदल घडण्याची येत्या काही महिन्यांतच दाट शक्यता आहे. याचा अर्थ केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टक्कर घेण्यासाठी प्रियांका गांधी हे काँग्रेसचे “सरप्राईज एलिमेंट” असण्याची शक्यता आहे!!
Major shift in Congress offing, priyanka Gandhi “in”, rahul Gandhi may be “out” soon!!
महत्वाच्या बातम्या
- Religious Conversion : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचा सापळा रचणाऱ्या शाहनवाजला मुंबईतून अटक
- पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नितीश कुमार बाहेर, तर मग उरलेत किती??
- न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस
- आळंदीत लाठीमार झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट खुलासा