हिजबुल कमांडर फारुख नलीही ठार.
विशेष प्रतिनिधी
Kulgam जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज म्हणजेच गुरुवारी सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहा लाखांचे बक्षीस असलेला अतिरेकी फारुख नलीही चकमकीत ठार झाला आहे. तो दहशतवादी संघटना हिजबुलचा कमांडर होता आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.Kulgam
ही चकमक कुलगामच्या कादर भागात घडली, जी गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केली होती. ज्या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती त्या भागाला सुरक्षा दलांनी वेढा घातला.
स्वत:ला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. बराच वेळ दोन्ही बाजूंनी अंदाधुंद आणि जोरदार गोळीबार सुरू होता. अखेर या चकमकीत सुरक्षा दलांना यश आले आणि 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सनेही चकमकीसंदर्भात महत्त्वाची माहिती X वर पोस्ट केली आहे.