• Download App
    Chhattisgarh छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई चकमकीत पाच जण ठार

    Chhattisgarh

    आतापर्यंत या चकमकीत पोलीस कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.


    विशेष प्रतिनिधी

    छत्तीसगड : Chhattisgarh छत्तीसगडमध्ये पोलीस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सीमावर्ती भागात अबुझमद येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.Chhattisgarh



    मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. अजूनही चकमक सुरूच असल्याचं वृत्त आहे. दोन्ही बाजूंमध्ये अधूनमधून गोळीबार होत आहे. आतापर्यंत या चकमकीत पोलीस कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे.

    घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि मोठ्या प्रमाणात मालही जप्त करण्यात आला आहे. कांकेर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आयके एलिसेला यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या पार्टीला घेरले असून अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Major operation against Naxalites in Chhattisgarh five killed in encounter

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय फिरवला, म्हटले- नाडा खेचणे, स्तन पकडणे हा रेपचाच प्रयत्न

    Galgotias University : सरकारने गलगोटिया विद्यापीठाला AI समिटमधून बाहेर केले; चिनी रोबोटिक डॉगला आपला म्हटले होते

    Imran Khan : 5 देशांच्या 14 माजी कर्णधारांचे पाकिस्तान सरकारला पत्र; इम्रान खान यांच्या उपचाराची मागणी