• Download App
    INDI अलायन्सचा वाचा आठवडाभरातला पॉलिटिकल परफॉर्मन्स!! Major cracks appeared in I.N.D.I alliance in karnataka, tamilnadu, punjab!!

    INDI अलायन्सचा वाचा आठवडाभरातला पॉलिटिकल परफॉर्मन्स!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेत 33% महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरात मोदीविरोधी INDI अलायन्स पॉलिटिकल परफॉर्मन्स काय होता, तर राहुल गांधी म्हणाले, महिलांच्या हक्काचे ठीक आहे, पण मी ओबीसींना हक्क मिळवून देणारच!!, राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि ओबीसी मुद्दा लावून धरायचे ठरविले आहे. Major cracks appeared in I.N.D.I alliance in karnataka, tamilnadu, punjab!!

    त्याचवेळी कावेरी पाणी वाटप प्रश्नावरून काँग्रेसचे राज्य असलेल्या कर्नाटकात बंगलोर बंद राहिले आणि कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांनी तामिळनाडूचे द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी तिकडे तामिळनाडूत शेतकऱ्यांनी कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले.

    INDI अलायन्सच्या समन्वय समितीची बैठक शरद पवारांच्या घरी पार पडली. त्या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गैरहजर राहिले. उलट कम्युनिस्टांनी राहुल गांधींनाच वायनाड सोडून इतर कोणता मतदारसंघ, विशेषतः भाजप राज्यातला मतदारसंघ शोधण्याची सूचना केली.

    पश्चिम बंगाल मध्ये अनेक शहरांमध्ये डेंगी तापाने कहर केला आहे. हा डेंगी तिथल्या तृणमूळ काँग्रेस सरकारनेच निर्माण केल्याची टीका प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

    आम आदमी पार्टीची राजवट असलेल्या पंजाब मध्ये लोकसभेच्या सर्व म्हणजे 13 जागा लढविण्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने केली आहे.



    या सर्वांवर वरकडी म्हणून शरद पवार अहमदाबादेत दोन दिवस गौतम अदानींच्या घरी मुक्कामाला राहिले. अहमदाबाद इंडस्ट्रियल एरियात बारामतीच्या शेतकऱ्याने सुरू केलेल्या एका कारखान्याचे उद्घाटन त्यांनी केले. त्यावेळी अध्यक्षस्थानी गौतम अदानी होते.

    महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन नारीशक्ती संमेलने घ्यायला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात त्यांनी राजस्थान मधून केली. काल गुजरात मध्ये नारीशक्ती संमेलन झाले. इथून पुढे अशीच संमेलने ते घेणार आहेत.

    याच दरम्यान भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील 78 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये 3 केंद्रीय मंत्री आणि 7 खासदारांना त्यांनी तिकिटे देऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.

    काँग्रेसच्या अद्याप एकही उमेदवार जाहीर झालेला नाही. प्रदेश काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणातून आणि काँग्रेस समितीने दिलेल्या यादीतून एकाच मतदारसंघात एकापेक्षा अनेक नावे समोर आल्याने काँग्रेस कन्फ्युज्ड झाल्याचे बातम्यांमध्ये म्हटले आहे, पण राहुल गांधींनी मात्र मध्य प्रदेश जिंकण्याचे भाकीत केले आहे.

    INDI अलायन्सचा हा साधारण आठवडाभरातला राजकीय परफॉर्मन्स आहे!!

    Major cracks appeared in I.N.D.I alliance in karnataka, tamilnadu, punjab!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IndiGo : अहमदाबाद विमानतळावर इंडिगोचे आपत्कालीन लँडिंग; कुवैतहून दिल्लीला येणाऱ्या विमानात टिश्यू पेपरवर हायजॅक व बॉम्ब असल्याची धमकी मिळाली

    LNG-Powered Train : देशातील पहिली एलएनजी ट्रेन धावण्यासाठी सज्ज; एकदा टाकी पूर्ण भरल्यावर 2200 किलोमीटरपर्यंत धावेल, डिझेलच्या तुलनेत तीनपट खर्च कमी

    Chief Punit Garg : RCOM चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अटक; ईडीने 40 हजार कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी अटक केली; फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप