Thursday, 8 May 2025
  • Download App
    शक्तिशाली स्फोटके निकामी केल्याने जम्मू-काश्मीहरमध्ये मोठा अनर्थ टळला|Major breakthrough for army in J and K

    शक्तिशाली स्फोटके निकामी केल्याने जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अनर्थ टळला

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू – जम्मू-काश्मीारच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शक्तिशाली आयईडी स्फोटके निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. जम्मू- राजौरी राष्ट्रीय महामार्गावरील बाथुनी-दिलोग्रा रस्त्यावर एका जलवाहिनीच्या खाली ही स्फोटके पेरण्यात आली होती.Major breakthrough for army in J and K

    ही स्फोटके आढळून आल्यानंतर येथील वाहतूक तीन तासांसाठी रोखण्यात आली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी ही स्फोटके पेरली असावीत असा संशय व्यक्त होतो आहे.



    दरम्यान जम्मूतील हवाईतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने आज काश्मीार खोऱ्यात चौदा ठिकाणांवर छापे घातले. काश्मीररमधील शोपियाँ, अनंतनाग आणि बनिहाल जम्मूच्या सूंजवान भागामध्येही कारवाई करण्यात आली.

    राज्यात आता प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून हल्ले सुरु झाल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. सरकारने तसेच सुरक्षा दलांनी हे हल्ले गांभीर्याने घेतले असून त्याच्या मुळाशी जावून छडा लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

    Major breakthrough for army in J and K

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी