बीएसएफचे जवान भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या अलर्टमध्ये सामील होणार होते.
विशेष प्रतिनिधी
जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला. त्याचवेळी 12 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमी बीएसएफ जवानांना शासकीय जवाहिर रुग्णालयात आणण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Major accident in Jaisalmer BSF truck overturns one soldier killed more than 12 injured
बीएसएफचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. बीएसएफच्या 149 व्या बटालियनचे हे जवान असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव एस. के. दुबे असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफचे जवान भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या अलर्टमध्ये सामील होणार होते, तेव्हा वाटेत ही मोठी दुर्घटना घडली. शाहगढ पोलीस स्टेशन हद्दीतील लंगतळाजवळ हा अपघात झाला.
Major accident in Jaisalmer BSF truck overturns one soldier killed more than 12 injured
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली सेवा विधेयकासह संसदेत मंजूर झालेल्या सर्व चार विधेयकांना राष्ट्रपतींकडून मिळाली मंजुरी!
- ‘’…म्हणून आम्हाला खात्री आहे की, मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य नक्की उगवेल’’ आशिष शेलारांचं विधान!
- नेपाळचे काँग्रेस खासदार आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालकाची पदवी बनावट, ‘CIB’ने केली अटक
- तुमचा देवावर विश्वास आहे? देवळात कितीदा जाता? माकपाचा देशभरातील कॉम्रेड्सना सवाल