विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची पुडी सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याची राजकीय गुगली टाकली. “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी मोदींच्या गुगलीचे वर्णन मोदींची ऑफर असे करून त्यावर पवारांची नकारात्मक प्रतिक्रिया घेतली. पण राष्ट्रवादीचे कठीण विलीनीकरण राष्ट्रवादीच्या नव्हे, तर काँग्रेसच्या अटी शर्तींमध्ये अडकणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. Main obstacle in NCP merger is not of party itself, but Congress conditions
पण काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी विलिनीकरणाच्या मुद्यावर काँग्रेस स्टाईल गुगली टाकली. विलिनीकरणाबाबत काँग्रेसच्या अटी – शर्ती आत्ताच सांगायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीनंतर ते पाहता येईल, असे चेन्निथला यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाची भूमिका शरद पवारांनी मांडली त्यावर काँग्रेसची भूमिका काय??, असे विचारले असता चेन्निथला म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे विलीनीकरणाला काँग्रेसची हरकत नाही. पण निर्णय पवारांनी घ्यायचा आहे.
पण राष्ट्रवादीचे विलिनीकरण करवून घ्यायला काँग्रेस तयार आहे का??, असे विचारल्यावर चेन्निथला म्हणाले, आधी शरद पवारांची तयारी हवी, मग काँग्रेसच्या तयारीचा मुद्दा येईल.
पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण करवून घेण्यासाठी काँग्रेसच्या काही अटी – शर्ती आहेत का??, असे विचारल्यावर रमेश चेन्निथला म्हणाले, विलिनीकरणासाठी काँग्रेसच्या अटी – शर्ती आत्ताच सांगायची काही गरज नाही. लोकसभा निवडणुका झाल्यावर त्यांच्यावर विचार करता येईल.
रमेश चेन्निथलांचे नेमके हेच वक्तव्य काँग्रेस स्टाईलची गुगली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेस मधले विलिनीकरण पवारांना वाटते तेवढे सोपे नाही. किंबहुना ते फक्त पवारांच्या सोयीच्या अटी शर्तींवर बिलकूल होणार नाही. काँग्रेस देखील पवारांवर विशिष्ट अटी – शर्ती लादूनच राष्ट्रवादीचे विलीनीकरण करवून घ्यायला तयार होईल. त्यासाठी पवारांचा लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स ताडून पाहिला जाईल. पवारांची शक्ती पूर्ण क्षीण झाल्याची खात्री पटल्यानंतरच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ काँग्रेसमध्ये विलिनीकरण करवून घेण्यात येईल, ही चेन्निथलांच्या वक्तव्यातली काँग्रेस स्टाईल गुगली आहे!!
Main obstacle in NCP merger is not of party itself, but Congress conditions
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!