• Download App
    भाजपद्वेषात आंधळ्या महुओ मोईत्रांना रोडरोमिओंचेही वाटू लागले प्रेम|Mahuo Moitra, who was blinded by BJP hatred, began to feel the love of Rodromio

    भाजपद्वेषात आंधळ्या महुओ मोईत्रांना रोडरोमिओंचेही वाटू लागले प्रेम

    • एखाद्या महिलेला रोडरोमिओंबाबत प्रेम वाटू लागले म्हणणे सभ्यपणाचे नाही हे मान्य. पण भाजपद्वेषात आंधळ्या झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांनीच हे वक्तव्य केले आहे.Mahuo Moitra, who was blinded by BJP hatred, began to feel the love of Rodromio
    • योगी आदित्यनाथ यांना विरोध करताना आम्ही आमच्या रोमिओंवरील प्रेम करतो, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर देताना महुओ मोईत्रा यांनी एक ट्विट केले आहे.मात्र, त्यावर टीका होऊ लागली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : एखाद्या महिलेला रोडरोमिओंबाबत प्रेम वाटू लागले म्हणणे सभ्यपणाचे नाही हे मान्य. पण भाजपद्वेषात आंधळ्या झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुओ मोईत्रा यांनीच हे वक्तव्य केले आहे.



    योगी आदित्यनाथ यांना विरोध करताना आम्ही आमच्या रोमिओंवरील प्रेम करतो, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर देताना महुओ मोईत्रा यांनी एक ट्विट केले आहे.मात्र, त्यावर टीका होऊ लागली आहे.

    त्यांनी म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांनी भाजपा सत्तेवर आल्यावर बंगालमध्येही अ‍ॅँटी रोमिओ स्क्वाड सुरू करू असे म्हटले आहे. परंतु, लक्षात ठेवा आम्हा बंगाल्यांच्या ह्रदयातच प्रेम आहे.

    आम्हाला आमचे संगीत आवडते, आमचे काव्य आवडते, आमची मिठाई आवडते आणि हो, आमचे रोमिओजही आवडतात.महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रस्त्यावरील छेडछाडीला कंटाळून अनेक मुलींनी आत्महत्याही केल्या आहेत.

    हे रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात अ‍ॅँटी रोमिओ स्क्वॉड तयार केले आहेत. हे सांगताना हुगळी येथील सभेत बोलताना योगी म्हणाले, माता-भगिनींचा सन्मान राहावा यासाठी भाजपा सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालमध्येही अ‍ॅँटी रोमिओ स्क्वॉडस तयार केले जातील. तृणमूलने पोसलेले सगळे रोमिओ गजाआड करू.

    Mahuo Moitra, who was blinded by BJP hatred, began to feel the love of Rodromio

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य