वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेत कथित पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात तृणमूल खासदार महुआ मोईत्रा गुरुवारी लोकसभेच्या नैतिक समितीसमक्ष हजर झाल्या. चौकशीदरम्यान काही प्रश्नांवरून नाराजी व्यक्त करून महुआ चौकशी सुरू असतानाच बाहेर पडल्या. बाहेर आल्यावर महुआ संतापल्या आणि जोरात आेरडल्या. त्या म्हणाल्या, समितीचे अध्यक्ष व भाजप खासदार विनोद सोनकर यांनी अतिशय खासगी व अनैतिक प्रश्न विचारले. माझ्या भूमिकेचे समर्थन करून पाच विरोधी खासदारही बाहेर आले.Mahua’s appearance before the ethics committee; She said angrily, the president asked unethical questions
वास्तविक महुआ यांनी संसदेचे लॉग-इन क्रेडेन्शियल्स निकटवर्तीय मित्र व उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना दिल्याचा दावा माध्यमांसमोर मान्य केला. परंतु त्यामागे आर्थिक उद्देश नव्हता. या आरोपांमागे अदानी समूहाचा हात अाहे, असा आरोपही त्यांनी केला. नंतर महुआ यांनी लोकसभा अध्यक्ष आेम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात या प्रकरणाची तुलना वस्त्रहरणाशी केली. समितीचे अध्यक्ष सोनकर यांनी विरोधी सदस्यांवर अनैतिक वर्तनाचा आरोप करताना प्रश्नांना तोंड द्यायचे नाही म्हणून महुआ यांनी अतिशय अशोभनीय भाषेचा वापर केल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार व समितीचे सदस्य एन. उत्तम कुमार रेड्डी म्हणाले, अध्यक्षांचे प्रश्न अशोभनीय वाटले. भाजप खासदार व समितीचे सदस्य अपराजिता सारंगी म्हणाले, महुआ यांना अतिशय असभ्य व अहंकारी वागणूक मिळाली.
भाजप खासदार व वकीलांचा आरोप
भाजप खासदार निशिकांत दुबे व वकील अनंत देहाद्राई यांनी महुआ यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप केला. जय महुआंचे मित्र आहेत. महुआ यांनी चौकशीच्या वेळी झालेल्या आरोपांना फेटाळून लावले. वैयक्तिक संबंध तुटावे यासाठी देहाद्राई यांनी आरोप केल्याचे त्यांनी सांगितले.
महुआंना कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही : दुबे
दुबे म्हणाले, महुआ यांनी कामकाजाबद्दल चुकीची कल्पना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नैतिक समितीचे नेतृत्व आेबीसी खासदाराकडे असल्याने विरोधी पक्ष अस्वस्थ झाला आहे. मी तसेच इतर लोकांनी दिलेल्या पुराव्यांमुळे कोणतीही शक्ती महुआ यांना वाचवू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.
जय यांच्याशी संबंध बिघडणे हे वादाचे मूळ : महुआ
सुत्रांच्या माहितीनुसार, महुआ यांनी संपूर्ण प्रकरणामागे जय अनंत देहाद्रोईंसोबतचे संबंध बिघडण्याचे कारण असल्याचा दावा केला. लॉग इन पासवर्ड इतरांना दिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही. कारण याद्वारे केवळ प्रश्न विचारले जातात, असे महुआ यांनी सांगितले.
Mahua’s appearance before the ethics committee; She said angrily, the president asked unethical questions
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : ”सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेऊ शकत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्ट भूमिका!
- world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!
- अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनाही खुशखबर; दिवाळीत एसटी महामंडळाला 378 कोटींची मदत!!
- मनोज जरांगेंचे उपोषण सुटले; मराठा आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत दिला वेळ!!