• Download App
    लाचखोरी करून लोकसभेत विचारले प्रश्न, महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द!!; संतापून पडल्या बाहेर, मोदी सरकार विरुद्ध ओकली आग!! Mahua Moitra's MP candidacy canceled

    लाचखोरी करून लोकसभेत विचारले प्रश्न, महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द!!; संतापून पडल्या बाहेर, मोदी सरकार विरुद्ध ओकली आग!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लाचखोरी करून लोकसभेत विचारले प्रश्न त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द!!, असे आज दुपारी लोकसभेत घडले लोकसभेच्या नैतिक वर्तन व्यवहार समिती अर्थात एथिक्स कमिटीने महुआ यांना लाचखोरी करून लोकसभेत प्रश्न विचारल्याबद्दल दोषी ठरविले आणि त्यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली. त्यानुसार महुआंची खासदारकी रद्द झाली. त्याचवेळी महुआ संतापून लोकसभेतून बाहेर पडल्या. त्या संतापातच त्यांनी मीडियाला संबोधित केले. त्यावेळी त्यांच्या पाठीशी सोनिया गांधी उभ्या होत्या. Mahua Moitra’s MP candidacy canceled

    महुआ मोईत्रा यांनी एका बिझनेसमन कडून लाच घेऊन उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात लोकसभेत प्रश्न विचारले होते. संबंधित बिझनेसमनने स्वतः प्रतिज्ञापत्राद्वारे एथिक्स कमिटी समोर हा खुलासाही केला होता. तो पुरावा ग्राह्य धरून एथिक्स कमिटीने महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली.

    एथिक्स कमिटीने अहवाल दिल्यानंतर या अहवालावर संसदेत चर्चा झाली. त्यानंतर आवाजी मतदानाने महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एथिक्स समितीच्या रिपोर्टवर अॅक्शन घेण्यासाठी प्रस्ताव मांडला. महुआ यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीच हा आरोप केला होता. या आरोपानंतर महुआ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन दुबे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता.

    स्पीकर आमच्यासोबत

    महुआ मोईत्रा यांच्या विरोधात लोकसभेत प्रस्ताव मंजूर झाला. याआधी सभागृहात चर्चा झाली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही न्याय नव्हे, तर चर्चा करत आहोत. हे सभागृह न्यायालयासारखे काम करणार नाही. मी नियमानुसार काम करत आहे. माझा तो अधिकार नाही. हा सभागृहाचा अधिकार आहे. सभागृहाला अधिकार नसता तर मी आतापर्यंत निर्णय दिला असता, असं ओम बिरला म्हणाले. तर, कोई आमच्यासोबत असो वा नसो. आपले स्पीकर सोबत आहेत. ते योग्य निर्णय घेतील आणि आम्ही ऐकू, असे काँग्रेस नेते अधीर रंजन म्हणाले.

    संतापून निघाल्या बाहेर

    हे सगळे होत असताना महुआ संतापून बाहेर पडल्या. त्या संतापातच त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आज माझी खासदारकी रद्द करण्यात आली आहे. उद्या माझ्या घरी सीबीआय पाठवतील. पण अदानीविरुद्ध काहीच होणार नाही. मी अदानीचा मुद्दा उचलला होता. पण अदानींच्या 30000 कोटींच्या घोटाळ्यावर मोदी सरकारने मौन का साधले?? माझ्या चौकशीत एक छदामही सापडला नाही. पण एथिक्स कमिटीने कांगारु कोर्टासारखे काम केले. मला दोषी ठरवले, अशी टीका महुआ यांनी केली. यावेळी त्यांच्या पाठीमागे सोनिया गांधी उभे होत्या महुआ अत्यंत भडकून पत्रकारांसमोर निवेदन करत होत्या आणि त्याला सोनिया गांधी मान डोलवत होत्या, असे चित्र व्हिडिओत दिसले.

    Mahua Moitra’s MP candidacy canceled

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली