विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: स्वत:ला भद्र लोक समजणाऱ्या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाच्या एका खासदाराला बिहारी गुंडा म्हणून हिणविले आहे. मोईत्रा यांनी आपला हिंदी द्वेष पुन्हा एकदा दाखवून दिला असल्याचे आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.Mahua Moitra, who considers himself a gentleman, hates Hindi, calls BJP MP a Bihari goonda
माहिती तंत्रज्ञान (आयटी) यवरील संसदीय समितीच्या बैठकीत मोईत्रा यांनी दुबे यांना बिहारी गुंडा म्हटले. दुबे यांनी लोकसभेत बोलताना संपूर्ण आयुष्यात आपला असा अपमान कधी झाला नव्हता, असे म्हटले आहे. ते म्हणाले, या सभागृहाच्या सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे.
खासदार म्हणून हे माझे तेरावे वर्ष आहे. माझ्या आयुष्यात अशा प्रकारे हिणविले गेले नाही. त्याचे कारण तरी काय? आमचा दोष काय? आमचा दोष हाच की आम्हाला या देशाचा विकास करायचा आहे. आम्ही मजूर म्हणून काम केले आहे,
हिंदी भाषिक लोक म्हणून, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील असो आम्ही कठोर परिश्रम केले आहेत. आम्ही भगवान राम यांच्याकडून धडे शिकलो आहोत. हा बिहारच्या अभिमानावर हल्ला आहे.
दुबे म्हणाले, तृणमूल कॉँग्रेसला सर्वच हिंदी भाषिकांची अॅलर्जी आहे. म्हणूनच त्यांनी मला ‘बिहारी गुंडा’ म्हटले. हा बिहारच्या अभिमानावर हल्ला आहे. त्यांनी माझी माफी मागावी.
निशिकांत दुबे यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करत एक ट्विट पोस्ट केले आहे.
तुमच्या खासदाराने ज्या प्रकारे बिहार गुंडा या शब्दांचा वापर करून मला शिवीगाळ केली त्यातून तुमच्या पक्षाचा उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक लोकांबद्दल द्वेष देशासमोर उघड झाला आहे.
Mahua Moitra, who considers himself a gentleman, hates Hindi, calls BJP MP a Bihari goonda
महत्त्वाच्या बातम्या
- इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार
- नारायण राणेंवर टीका करताना भास्कर जाधव बरळले, म्हणाले असली मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी येऊ नयेत
- कोरोना निर्बंध शिथिल : मुंबईत दुकाने, हॉटेल्सना वेळ वाढवून मिळणार!; २५ जिल्ह्ंयाना देखील मिळेल लाभ
- सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात; शिरोळ तालुक्यात मदतसामुग्रीचे वाटप