विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Mahayuti महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजधानीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये कोणत्या नेत्यांची बॉडी लँग्वेज कशी होती, यावरून माध्यमांनी तर्कवितर्क बांधले. Mahayuti leaders meet Union HM Amit Shah
या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधी पोहोचले त्यांची आणि अमित शाह यांची चर्चा झाली. नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पोहोचले. Mahayuti
या बैठकीचे फोटो रात्री उशिरा प्रसृत झाले. त्यामध्ये अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांना पुष्पगुच्छ देत आहेत आणि शेजारी एकनाथ शिंदे शांतपणे उभे आहेत, असे फोटो दिसले.
दुसऱ्या फोटोत अजित पवार हे अमित शाह यांना पुष्पगुच्छ देत आहेत. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. त्या फोटोत देखील एकनाथ शिंदे शांतपणे उभे आहेत.
या दोन फोटोंमधील बॉडी लँग्वेज वरून माध्यमांनी तर्कवितर्क लढविले. त्यानुसार अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले. त्यांना अजित पवारांनी “सेफ गेम” करून आधीच पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने ठरविल्यानुसार सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने घडून आल्या, असे बोलले जाऊ लागले. फोटोमध्ये दिसलेल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेज वरून हे तर्कवितर्क लढविले गेले.
प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद तसेच शिवसेनेच्या आणखी एका खासदाराला केंद्रात मंत्रीपद देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता संतुलनात भाजपने साथीला घेतल्याची चर्चा आहे. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पूर्णपणे भाजपचीच छाप राहील हे देखील या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
Mahayuti leaders meet Union HM Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Sharad pawar मास्टर माईंड + जरांगेंचे नेहमीच माध्यमांमध्ये “मास्टर स्ट्रोक”; पण ऐनवेळी अवसानघातातून बाउंड्री वर कॅच आऊट!!
- Waqf कायद्यात सुधारणेत विरोधकांचा अडथळा; सततच्या बहिष्कारमुळे Waqf JPC वर मुदतवाढ मागायची वेळ!!
- Manipur violence : मणिपूर हिंसाचाराशी संबंधित 3 प्रकरणांचा तपास NIAने हाती घेतला
- Bangladesh : बांगलादेशात इस्कॉन धर्मगुरूंच्या अटकेमुळे भारत नाराज; म्हटले- गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत, हक्क मागणारे जेलमध्ये