विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या महायुतीच्या शिंदे – फडणवीस सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विरोधात काँग्रेसचेच नेते कोर्टात गेले. लाडकी बहीण योजनेच्या खर्चामुळे बाकीच्या योजनांना कात्री लावली महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा टाकला म्हणून ती योजना रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली, पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मात्र आम्ही महिलांना दरमहा 3000 रुपये देऊ, अशी घोषणा राहुल गांधींनी मुंबईतल्या बीकेसी मध्ये केली. Congress leaders in court against Ladaki Bahin Yojana
महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे पहिली प्रचारसभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीने 5 मोठी आश्वासने दिली. आगामी काळात जनतेने महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान करुन सरकार स्थापन करुन दिलं तर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात या 5 योजना जाहीर करणार आहे. यातील पहिलं आश्वासन हे महालक्ष्मी योजनेचं आहे. या योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 3000 रुपये आणि बसप्रवास मोफत करणार आहे. विशेष म्हणजे दुसरी घोषणा देखील तेवढीच मोठी आहे. राज्य सरकार प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे तसेच मोफत औषधे देखील देणार आहे. या योजनेचं नाव कटुंब रक्षा योजना असं देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीच्या मोठ्या घोषणा
महाविकास आघाडीकडून राज्याच्या जनतेला तिसरी जी गॅरंटी देण्यात आली ती समानतेची हमी अशी देण्यात आली आहे. या माध्यामतून महाविकास आघाडी आपलं सरकार आल्यास राज्यात जातनिहाय जनगणना करणार आहे. तसेच राज्यातील 50 % आरक्षण हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मविआने आश्वासन दिलं आहे.
शेतकऱ्यांसाठी देखील महाविकास आघाडीने मोठं आश्वासन दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर सर्व शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ, असं मविआने जाहीर केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील, असंही मोठं आश्वासन देण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीने यावेळी बेरोजगार तरुणांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासनही महाविकास आघाडीने दिले
Congress leaders in court against Ladaki Bahin Yojana
महत्वाच्या बातम्या
- Nandankanan : भारतीय रेल्वेशी संबंधित मोठी बातमी! नंदनकानन एक्स्प्रेसवर गोळीबार, दहशतीचे वातावरण
- Sanjay Verma :संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती!
- Jaishankar : जयशंकर यांनी कॅनडाला फटकारले; हिंदू आणि मंदिरांवरील हल्ल्यांवर जोरदार टीका केली
- Shahu Maharaj कोल्हापुरात काँग्रेसमध्ये काल रंगले माघारनाट्य + संतापनाट्य; आज खासदार शाहू महाराजांनी लिहिले सर्वांना पत्र!!