• Download App
    खलिस्तानी फुटीरांकडून इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; मोदींच्या दौऱ्यापूर्वी अडथळ्याचा डाव!! Mahatma Gandhi statue vandalized in Italy by Khalistani separatists

    खलिस्तानी फुटीरांकडून इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; मोदींच्या दौऱ्यापूर्वी अडथळ्याचा डाव!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नरेंद्र मोदी लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर त्यांच्या पहिल्याच प्रदेश दौऱ्यात अडथळा आणण्याच्या दृष्टीने खलिस्तानी फुटीरांनी इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली. महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर काही वेळातच खलिस्तानी फुटीरांनी पुतळ्याची विटंबना केली, तसेच पुतळ्याच्या भिंतीवर खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्याबद्दल वादग्रस्त मजकूरही लिहिला. आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ सदर परिसर स्वच्छ करून घेतला असल्याची माहिती देखील समोर आली. Mahatma Gandhi statue vandalized in Italy by Khalistani separatists

    इटलीमध्ये उद्या जी 7 देशांची बैठक होणार असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. जी 7 देशांची 50 वी परिषद इटलीच्या अपुलीया प्रांतातील बोर्गो एग्नाझिया या आलिशान रिसॉर्टमध्ये होत आहे. 13 ते 15 जून असे दोन दिवस ही परिषद चालणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी या परिषदेची माहिती देताना सांगितले की, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अपुलीयाला रवाना होणार आहेत.

    इटलीत महात्मा गांधींच्या अर्धाकृती पुतळ्याच्या विंटबनेची माहिती देताना क्वात्रा म्हणाले की, भारतीय यंत्रणेने या घटनेची माहिती इटलीच्या यंत्रणेला दिली आहे. तसेच योग्य ती कारवाई करण्यासही सांगितले आहे. जे कुणी दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. बुधवारी माध्यमांशी संवाद साधत असताना क्वात्रा यांनी ही माहिती दिली.

    मागच्या वर्षी कॅनडाच्या विद्यापीठातील परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील विद्यापीठात खलिस्तानी कट्टरपंथीयांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती.

    Mahatma Gandhi statue vandalized in Italy by Khalistani separatists

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले