प्रतिनिधी
नवी दिल्ली / नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात प्रजासत्ताक दिनी येथे 26 जानेवारी 2023 रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. Maharashtra’s Chitrarath will be seen in the 26th January Republic Day programme
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात दिल्लीत संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट नाही, ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आली. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांकडून तातडीने आढावा घेऊन त्याची कारणे जाणून घेतली. त्यांनी लगेच संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांना फोनवरून संपर्क साधला. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी पोटतिडकीने महाराष्ट्राची बाजू मांडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्य पथावर संचलनात महाराष्ट्र दिसला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी घेत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या कर्तव्य पथावरील संचलनात समाविष्ट असावा, अशी विनंती मुनगंटीवार संरक्षण मंत्र्यांना केली. त्यांची दखल श्री. राजनाथ सिंह यांनी घेतली. त्यामुळे दिल्ली येथील संचलनात आता २६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. शुक्रवारी 23 डिसेंबर 2022 रोजी या संदर्भातील पत्र केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट करून घेतल्याबद्दल मुनगंटीवार यांनी केंद्र सरकार आणि राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत.
Maharashtra’s Chitrarath will be seen in the 26th January Republic Day programme
महत्वाच्या बातम्या