वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज चौकशी केली आहे.Maharashtra state co oprative bank fraud; ed questions ncp minister prajakt tanpure
ईडीने केलेल्या चौकशीचे तपशील अद्याप बाहेर आलेले नसले तरी अनेक मंत्र्यांबरोबरचे तनपुरे यांचे संबंध तसेच काही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून झालेले काही कर्ज वाटप, अफरातफर यामध्ये त्यांचा संबंध बदल या विषयात ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केल्याचे समजते.
अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल
प्राजक्त तनपुरे हे राहुरीच्या तनपुरे या राजकीय घराण्यातले सगळ्यात तरुण नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे ते पुत्र आहेत. राहुरी मधून ते पहिल्यांदाच आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना पहिल्याच टर्म मध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज त्यांची सक्तवसुली संचालनालय आहे अर्थात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली आहे.
Maharashtra state co oprative bank fraud; ed questions ncp minister prajakt tanpure
महत्त्वाच्या बातम्या