नाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्रचंड उलटफेर झाला असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) प्रचंड विजयाच्या दिशेने पुढे सरकली, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल महागठबंधन यांची मोठी घसरण झाली.
निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जारी केलेले सकाळी 11.30 वाजेपर्यंतचे कल पाहिले, तर जनता दल युनायटेड 75, भाजपा 82, राष्ट्रीय जनता दल 36, लोक जनशक्ती रामविलास पासवान पक्ष 22 कम्युनिस्ट पार्टी 6, काँग्रेस 7, हिंदुस्तान अवाम मोर्चा 4, विकासशील इंसान पार्टी 1 AIMIM 1 जागांवर आघाडीवर आहेत.
याचा अर्थच निकालांमध्ये प्रचंड उलटफेर झाला असून तो सत्ताधारी बाजूने मोठ्या प्रमाणावर झुकला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये जनता दल युनायटेड (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) हे सर्वसाधारणपणे बरोबरीने चालले होते. पण मतमोजणीच्या फेऱ्या वाढल्याबरोबर हा कल बदलला. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलावर प्रचंड आघाडी घेतली.
– 16000 स्वयंसेवक बिहारच्या मैदानात
याचा अर्थ महाराष्ट्राचा निकाल बिहारमध्ये रिपीट झाले. महाराष्ट्रात सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु ते यश त्यांना विधानसभेत टिकवता आले नव्हते. त्या उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिशय समन्वय साधून जमिनी स्तरावर काम केले होते त्याचा लाभ महाराष्ट्रात भाजपला झाला तसाच लाभ बिहारमध्ये झाला कारण बिहारमध्ये संघाने आपले 16000 स्वयंसेवक निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. मतदार याद्यांच्या तपासणीपासून ते प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांनी भाजपसाठी अनुकूल काम केले. यासाठी संघाने आणि भाजपने वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन केले होते भाजपला अनुकूल असणारे मतदार आणि मतदारसंघ कुठल्याच पक्षाकडे कल नसलेले मतदार आणि भाजप विरोधी मतदार अशा तीन स्तरांवर संघ स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदार संपर्क अभियान राबविले. ज्याचा फारसा गाजावाजा माध्यमांमधून झाला नाही परंतु जमिनीस्तरावरचे काम मात्र थांबले नव्हते. ते अधिक वेगाने पुढे सरकत होते. पण माध्यमांना ते टिपता आले नाही.
– जातीचे राजकारण भेदले
बिहारचे राजकारण जातीच्या चिखलात रुतले असताना अखंड हिंदू समाजाचा विचार रुजविणे कठीण होते. मतदारांना बाहेर काढणे अवघड होते. परंतु, संघाच्या स्वयंसेवकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारचे आणि बिहार मधल्या नितीश कुमार सरकारचे कल्याणकारी काम आणि योजना बिहारच्या मतदारांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविल्या. प्रत्येक मतदारसंघातला जमिनी स्तरावरचा प्रतिसाद तपासला. त्याविषयीची सगळी माहिती राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर पोहोचविली. वेगवेगळ्या जात समूहांची व्यवस्थित छाननी केली. त्यांच्या समस्या आणि मुद्दे यांचा अभ्यास करून त्यावर व्यवहारात्मक पातळीवर तोडगे काढले. या सगळ्या प्रक्रियेमुळे बिहार मधले मतदान 10 % टक्क्यांनी वाढले. त्याचा लाभ सत्ताधारी जनता दल युनायटेड आणि भाजप यांना झाला.
– मुस्लिम + यादव राजकारणाला छेद
महत्त्वाचे म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या जातीच्या राजकारणाला संघ आणि भाजपने यशस्वीरित्या छेद दिला. लालू आणि तेजस्वी यांचे मुस्लिम + यादव (MY combination) भेदले. मुस्लिम + यादव या बेरजेच्या राजकारणाचा त्यांना फारसा लाभ मिळू दिला नाही. त्या उलट महिला आणि तरुणांची मते जातीच्या पलीकडे जाऊन ती भाजप आणि जनता दल युनायटेड यांना मिळवून दिली. संघ स्वयंसेवक आणि भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली.
Maharashtra results repetition in Bihar, RSS shows power
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये उद्या निकालाच्या दिवशीच “नेपाळ” + “बांगलादेश” घडवायची लालूंच्या पक्षाची तयारी; दमबाजी करणाऱ्या नेत्याविरुद्ध FIR!!
- Air India : एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी; टिश्यू पेपरवर लिहिले- BOMB गूड बाय, वाराणसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
- नाशिक मध्ये मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन; जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
- Kangana Ranaut : कंगना रणौतवर देशद्रोहाचा खटला चालणार; शेतकरी आंदोलनात रेप-हत्या झाल्याचे म्हटले होते; सुनावणी आग्रा न्यायालयात