विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील 6 ट्रकवर बेळगाव नजीक कन्नड आरक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून मोठा धुडगूस घातला. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकचा निषेध केला आहे. पण गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न अचानक ऐरणीवर कसा आला? त्यामागचे नेमकी राजकीय इंगित काय?, याची चर्चा सुरू आहे. त्याच वेळी दगडफेक करणारी कन्नड रक्षण वेदिके ही संघटना नेमकी आहे तरी काय?, तिचे नेमके कोणाशी लागेबंधे आहेत?, याचा थोडा शोध घेतल्यावर एक वेगळे तथ्य समोर आले आहे. Maharashtra karnataka boundary dispute; kannada rakshan vedike has long standing relations with Congress
- कर्नाटकात 2023 च्या मध्यावर विधानसभा निवडणुका आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षात त्या राज्यात काट्याची टक्कर आहे. कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेचे काँग्रेसशी निकटचे संबंध आहेत.
- महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणि कर्नाटकात भाजपचे सरकार असताना सीमा प्रश्न पेटला तर त्याचा राजकीय लाभ काँग्रेसला होऊ शकतो, असा तिथल्या काँग्रेस नेतृत्वाचा होरा आहे.
- कन्नड रक्षण वेदिके संघटनेचा राजकीय इतिहास बघितला तर ही संघटना साधारण निवडणुकीच्या आसपास ऍक्टिव्ह झालेली दिसते.
- या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस नेत्यांशी निकटचे संबंध आहेत. कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना जेव्हा ED ने अटक केली, तेव्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले नाही, तर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने आंदोलन केले होते.
- कन्नड रक्षण वेदिकेचे डी. के. शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांचे निकटचे संबध आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांचा सहभाग असतो.
- काँग्रेसच्या अनेक आंदोलनांमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते पुढाकार घेऊन सहभाग नोंदवत असतात.
- आताही कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा यांना कर्नाटक सरकारने बेळगाव येथे येण्यास बंदी घातली होती. परंतु ही बंदी मोडून नारायण गौडा आज 6 डिसेंबर रोजी बेळगाव आले. त्याचवेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या 6 ट्रकवर दगडफेक केली. हा योगायोग काही वेगळेच सांगतो आहे.
Maharashtra karnataka boundary dispute; kannada rakshan vedike has long standing relations with Congress
महत्वाच्या बातम्या
- मुंसीमावाद चिघळला; बेळगावनजीक कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस, 6 ट्रकवर दगडफेक
- बेळगावात महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक; फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह
- भाजपची स्ट्रॅटेजी युती – प्रतियुती, आघाडी – प्रतिआघाडीच्या पलिकडची; एकूण मतदानातल्या 50 % वाट्याची!!
- सक्तीच्या धर्मांतर गंभीर मुद्दा; प्रतिज्ञापत्राद्वारे तोडगा सांगा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश; 12 डिसेंबरला पुढील सुनावणी