• Download App
    कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री चिंतेत, धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य न करण्याचे आवाहन|Maharashtra Home Minister Concerned Over Karnataka Hijab Case, Appeal not to make statements that would create religious bitterness

    कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहमंत्री चिंतेत, धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य न करण्याचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: कर्नाटकातील एका शाळेत हिजाब घालण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील चिंतेत आहेत. धार्मिक कटुता निर्माण होईल असे वक्तव्य करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.Maharashtra Home Minister Concerned Over Karnataka Hijab Case, Appeal not to make statements that would create religious bitterness

    हिजाब प्रकरणी कर्नाटकात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कर्नाटकातील प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटल्याचे स्पष्ट होताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृह विभागातील अधिकाºयांना काही सूचना केल्या आहेत.



    गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्विट करत जनतेला ही विनंती केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दु्दैर्वी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे.

    माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.’कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटले असून येथे फारूखी लुकमान नावाच्या विद्यार्थी नेत्याने एक बॅनर लावले आहे. ‘पहले हिजाब, फिर किताब.. हर किमती चीज पर्दे में होती है’, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे.

    Maharashtra Home Minister Concerned Over Karnataka Hijab Case, Appeal not to make statements that would create religious bitterness

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे