भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत “महाराष्ट्र प्रयोग” करायचे ठरवलेले दिसत आहे. 2022 मध्ये भाजपने महाराष्ट्रात आपल्या विशिष्ट सदस्य संख्यांच्या ताकदीपेेक्षा जास्त मते मिळवून राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रूपाने तिसरा उमेदवार निवडून आणला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या पायाखालची वाळू घसरायला लागली होती आणि विधान परिषद निवडणुकीत ती वाळू पूर्ण घसरून ठाकरे – पवार सरकार पडले होते. Maharashtra experiment in UP rajyasabha elections BJP to split samajwadi party votes
सध्या सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत दरम्यान महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली, पण अतिरिक्त उमेदवार देणे टाळून महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक टाळली.
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांची निवडणूक होत आहे. पण आपल्या विशिष्ट सदस्य संख्येच्या ताकदीपेक्षा जास्त मते मिळवायची ठरवून भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आठवा उमेदवार दिला आहे. समाजवादी पार्टीतून भाजपमध्ये आलेले संजय शेठ यांना भाजपने राज्यसभेसाठी मैदानात उतरवले आहे. त्याच वेळी समाजवादी पार्टीने रामजी लाल सुमन यांना तिसऱ्या उमेदवाराच्या रूपाने त्याच निवडणुकीत उतरवून उत्तर प्रदेशात चुरस निर्माण केली आहे.
पण इथेच समाजवादी पार्टीवर “गेम” पडली आहे. कारण समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते पक्षाचे सरचिटणीस सलीम शेरवानी यांनी राजीनामा देऊन पक्षाविरुद्ध बंडखोरी केली आहे. समाजवादी पार्टीने आपल्या परंपरेनुसार राज्यसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवाराला उतरवायला हवे होते, पण अखिलेश यादव यांनी ती परंपरा पाळली नाही. आपल्याला उमेदवारी दिली नाही हे तर खरेच, पण त्यांनी दुसऱ्या मुस्लिम उमेदवाराचा देखील विचार केला नाही, असा आरोप करून सलीम शेरवानी यांनी समाजवादी पार्टी सोडली.
सलीम शेरवानी यांच्या या निर्णयाचा समाजवादी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. कारण समाजवादी पार्टीच्या 34 मुस्लिम आमदारांपैकी अनेक आमदार अखिलेश यादव यांच्याबरोबर राहण्याच्या मन:स्थितीत उरलेले नाहीत आणि हा खरा समाजवादी पार्टीला धोका आहे.
भाजपचे आठवे उमेदवार संजय शेठ हे समाजवादी पार्टीतूनच भाजपमध्ये आल्याने त्यांना समाजवादी पार्टीतलीच मते फोडून आपल्याकडे खेचून आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे आणि त्यातच सलीम शेरवानी यांनी उपस्थित केलेला मुस्लिम उमेदवार हा मुद्दा समाजवादी पार्टीला गोत्यात आणणारा आहे. हा खऱ्या अर्थाने भाजपचा उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीत “महाराष्ट्र प्रयोग” ठरणार आहे.
समाजवादी पार्टीला सुरुंग
उत्तर प्रदेशात मुळातच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहेच. त्यामुळे तिथे सरकार पाडण्याचा प्रश्न नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बेरजेचे राजकारण करण्यासाठी भाजपने आठवा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवून राज्यातल्या सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाला म्हणजेच समाजवादी पार्टीला आतून सुरुंग लावला आहे. याचा फायदा घेत भाजप आठवा उमेदवार राज्यसभेत पोहोचण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता असून त्याचबरोबर समाजवादी पार्टीची ताकद घटून लोकसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची अपेक्षा आहे.
370 टार्गेटसाठी बेरजेचे राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 चे टार्गेट दिले आहेत. यापैकी 80 जागा तर उत्तर प्रदेश मधल्याच आहेत. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त “स्कोअर” करणे ही योगी आदित्यनाथ सरकारची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनेच रणनीती आखून एकीकडे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढविण्याचे काम करताना समाजवादी पार्टी सारख्या प्रबळ विरोधी पक्षाच्या मतांची टक्केवारी घटविणे, त्यांच्या संख्याबळात छेद देणे हे काम योगी सरकारला करावे लागणार आहे. भाजपने समाजवादी पार्टीतला नेता आपल्याकडे खेचून त्याला राज्यसभेची उमेदवारी देणे हा या व्यापक रणनीतीतला एक छोटा भाग आहे. तो यशस्वी झाल्यानंतर रणनीतीमधली पुढची पावले उचलण्यात येणार आहेत.
भाजपचे राज्यसभा उमेदवार
1- सुधांशु त्रिवेदी
2- आरपीएन सिंह
3- अमरपाल मौर्या
4- तेजपाल सिंह
5- नवीन जैन
6- साधना सिंह
7- संगीता बलवंत
समाजवादी पार्टी राज्यसभा उमेदवार
1- जया बच्चन
2- आलोक रंजन
3- रामजी लाल सुमन
Maharashtra experiment in UP rajyasabha elections BJP to split samajwadi party votes
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!