हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड; आवाजी मतदानाने काँग्रेसकडेच अध्यक्षपद राहणार!!Maharashtra assembly speaker to be chosen by voice vote; MVA doubtful about its political strength
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. ते अध्यक्षपद या हिवाळी अधिवेशनातच भरले जाईल. आवाजी मतदानाने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची निवड अध्यक्षपदी करण्याची अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आवाजी मतदानाने विधानसभेचे अध्यक्ष निवडण्याची पद्धत देशात सगळीकडे रूढ आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यावर अनावश्यक वाद करू नये, असा “राजकीय सल्ला” देखील नाना पटोले यांनी दिला आहे.
पावसाळी अधिवेशनात गैरव्यवहार यावरून भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. तरी देखील महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्ष अथवा गुप्त मतदान न घेता आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक रेटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर महाविकास आघाडीला स्वतःच्या संख्याबळाची खात्री नसल्याचा टोला लगावला आहे.
काँग्रेस अंतर्गत विधानसभा अध्यक्षपदासाठी कोणताही वाद नसल्याचा आणि नेत्यांमध्ये स्पर्धा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील भोरचे वरिष्ठ आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. परंतु, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असू शकतो, अशी चर्चा आहे.
महाविकास आघाडीकडे संख्याबळाची खात्री नसल्याने ते आवाजी मतदानाने विधानसभा उरकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यावर नाना पटोले यांनी ही पद्धत देशात सगळीकडे रूढ आहे असे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.