narendra giri suicide note : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनानंतर त्यांची 8 पानी सुसाईड नोट समोर आली आहे. यात त्यांनी आनंद गिरी, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी, संदीप तिवारी यांना त्यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवले आहे. यासोबत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. mahant narendra giri suicide note Revealed, accused anand giri arrested by police prayagraj UP
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनानंतर त्यांची 8 पानी सुसाईड नोट समोर आली आहे. यात त्यांनी आनंद गिरी, लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी, संदीप तिवारी यांना त्यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवले आहे. यासोबत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
काय लिहिलंय सुसाइड नोटमध्ये?
सुसाईड नोटमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिले की, “मी महंत नरेंद्र गिरी आज आनंद गिरीमुळे खूप अस्वस्थ आहे. आज हरिद्वारकडून माहिती मिळाली की एक -दोन दिवसात आनंदगिरी मोबाईलद्वारे एखाद्या महिला किंवा मुलीसोबत चुकीचे काम करतानाचे फोटो व्हायरल करेल. मी महंत नरेंद्र गिरी बदनामीच्या भीतीने कुठे कुठे स्पष्टीकरण देत राहीन. मी ज्या सन्मानाने जगलो आहे, बदनामीत कसा जगू शकेन. म्हणूनच मी आत्महत्या करत आहे.”
या 8 पानांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पेजवर असे लिहिले आहे की, मी आत्महत्या करणार आहे. आनंदजी, आद्य प्रसाद तिवारी, संदीप तिवारी माझ्या मृत्यूला जबाबदार असतील. मी प्रयागराजच्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की, माझ्या हत्येला जबाबदार असलेल्या वरील लोकांवर कारवाई करावी. जेणेकरून माझ्या आत्म्याला शांती मिळेल.
सुसाईड नोटच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी
एका पानावर त्यांनी लिहिले की, मी नरेंद्र गिरी 13 सप्टेंबर 2021 रोजी आत्महत्या करणार होतो, पण हिम्मत करू शकलो नाही. महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या प्रत्येक पानावर त्यांचे नाव, तारीख खाली लिहून स्वाक्षरी केली आहे. यासोबत प्रत्येक पानावर ओम नमो: नारायण असेही लिहिले आहे.
महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येच्या प्रत्येक पानावर आपली समस्या उघडपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पान क्र. 2 वर लिहिले की, प्रिय बलवीर मठ आणि मंदिराच्या व्यवस्थेचा प्रयत्न तसाच कर, जसा मी केला. आशुतोष गिरी, नितेश गिरी आणि मंदिराचे सर्व महात्मा यांनी बलवीरला सहकार्य करावे.
mahant narendra giri suicide note Revealed, accused anand giri arrested by police prayagraj UP
महत्त्वाच्या बातम्या
- महिला अत्याचाराच्या ‘या’ घटनांनी हादरला महाराष्ट्र, आक्रमक विरोधकांची ठाकरे-पवार सरकारवर सडकून टीका, वाचा सविस्तर…
- साकीनाक्यापासून पुणे, परभणी – भिवंडीपर्यंत महिलांवर बलात्कार; ठाकरे – पवार सरकार आणि राज्यपाल यांच्यात मात्र “लेटर वॉर”
- पंकजा मुंडेंचे एक ट्वीट आणि गडकरींची तत्काळ कारवाई, पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भेगा कंत्राटदाराला भोवणार
- संतापजनक : परभणीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेने केली आत्महत्या, 2 आरोपींना अटक
- Canada Election Results : कॅनडाच्या जनतेने ट्रुडो यांना तिसऱ्यांदा दिली पंतप्रधानपदाची संधी, पण बहुसंख्य जागांचा दावा फोल ठरला