Sunday, 11 May 2025
  • Download App
    महादेव ॲप प्रकरण : 'काँग्रेसला सट्टेबाजीतून सत्तेत यायचे आहे' - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप! Mahadev App case Congress wants to come to power through Betting Union Minister Anurag Thakurs allegation

    महादेव ॲप प्रकरण : ‘काँग्रेसला सट्टेबाजीतून सत्तेत यायचे आहे’ – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप!

    महादेव ॲप प्रकरणी छत्तीसगडमध्ये ‘ईडी’च्या कारवाईनंतर राजकीय खळबळ उडाली आहे Mahadev App case Congress wants to come to power through Betting Union Minister Anurag Thakurs allegation

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी नवा गदारोळ उठला आहे. प्रत्यक्षात महादेव ॲप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दाव्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे.

    या संपूर्ण प्रकरणात एकीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल बॅकफूटवर आले आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.

    केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “भारतीय संघ विश्वचषकात चांगला खेळत असला, तरी आता काँग्रेस पक्ष सत्तेसाठी सट्टेबाजीची पद्धत अवलंबत आहे. त्यांना सट्टेबाजीच्या माध्यमातून सत्तेत यायचे आहे. छत्तीसगडमधील बेटिंग घोटाळा आपण पाहिला आहे. राज्यात लुटमार सुरू आहे. त्यांनी महादेवाचे नाव बदनाम केले आहे.’’



    अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस सत्तेत येण्यासाठी पैशाची ताकद वापरत आहे. निवडणूक प्रचारात विदेशी पैसा आणि विदेशी शक्ती वापरत आहे. काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी अपयशी ठरला आहे. हिमाचल प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आश्वासने दिली पण एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

    Mahadev App case Congress wants to come to power through Betting Union Minister Anurag Thakurs allegation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO’s 7 : द फोकस एक्सप्लेनर : इस्रोचे 7 उपग्रह भारतीय लष्कराचे डोळे; पाक सैन्य तळासह अतिरेकी लाँच पॅडची अचूक माहिती

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्याची धडक कारवाई रावळपिंडीपर्यंत पोहोचली, राजनाथ सिंहांनी प्रथमच उघडपणे सांगितली कहाणी!!

    IPL matches : इंग्लंडकडून IPL चे उर्वरित सामने आयोजित करण्याची ऑफर; भारत-पाक तणावामुळे लीग पुढे ढकलली, 16 सामने बाकी