वृत्तसंस्था
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत बंदची घोषणा करण्यात आली आहे. 11 तारखेला हा बंद करण्यात येईल. उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. 11 तारखेला म्हणजे ऐन नवरात्राच्या काळात महाविकास आघाडीतील घटक पक्ष बंदचे आवाहन करत आहेत. Maha Vikas Aghadi’ NCP-Congress-Shiv Sena alliance calls for a statewide bandh on October 11 against the Lakhimpur Kheri violence incident
राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत 11 तारखेच्या बंदची घोषणा पत्रकार परिषदेत केली.महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लखीमपूर-खीरी हिंसक घटनेचा निषेध करण्यात येऊन मृतात्म्यांना शांती मिळावी यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेकदा विविध कारणांसाठी बंद पाळण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेने पुकारलेले बंद कायम यशस्वी झाले आहेत. परंतु काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने पुकारलेले बंद कधी यशस्वी झाल्याची उदाहरणे नाहीत.
11 तारखेच्या बंदच्या निमित्ताने शिवसेनेच्या अडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपला देखील बंद सहभाग नोंदवतील आणि आपण पुकारलेला बंद यशस्वी झाल्याचा दावा करतील. प्रत्यक्षात बंदचे काम शिवसैनिक करतील आणि श्रेय राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते घेऊन जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Maha Vikas Aghadi’ NCP-Congress-Shiv Sena alliance calls for a statewide bandh on October 11 against the Lakhimpur Kheri violence incident
महत्त्वाच्या बातम्या
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख
- लखीमपूर खीरीप्रकरणी काउंटर एफआयआर दाखल, भाजप कार्यकर्त्याने हत्या, प्राणघातक हल्ला आणि गोंधळाचे केले आरोप
- कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली
- तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली